रोजच रुपयाची किंमत कोसळतय,रोखण्यासाठी सरकार काही करणार आहे का? शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे

मुंबई ऑनलाईन परिवतर्नाचा सामना-

रुपया हा केवळ कागदाचा तुकडा नाही, तर देशाची प्रतिष्ठा आहे, असं वक्तव्य भाजपच्या दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांनी संसदेत केलं होतं. त्यावेळी म्हणजेच काँग्रेसच्या काळात रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत 67 वरून 68 वर गेली होती तर संसदेत भाजपने सरकार वर हल्ला चढवला सुषमा स्वराज यांनी त्यावेळी खरं तेच सांगितलं होतं. आज तर रोजच रुपयाची किंमत कोसळत आहे आणि रोजच जागतिक पातळीवर देशाची अप्रतिष्ठा होत आहे. हे रोखण्यासाठी सरकार काही करणार आहे का?, असा हल्लाबोल सामनातून करण्यात आलाय

.राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर शिवाजीपार्कवर कोणाचा दसरा मेळावा होणार यासाठी शिवसेना आणि शिंदे गटामध्ये चांगलंच वातावरण चांगलंच तापलं होतं. अखेर दोन्ही गटाचा दसरा मेळावा 5 ऑक्टोबरला पार पडला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेळावा बीकेसी मैदानात तर शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांचा मेळावा शिवाजीपार्कमध्ये झाला.हे सर्व राजकीयनाट्य सुरू असातानाच शिवसेनेच्या सामना या अग्रलेखातून वारंवार शिंदे गट आणि विरोधकांवर खरमरीत टीका करण्याचं सत्र सुरूच आहे. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेने थेट केंद्र सरकारवरच हल्लाबोल केला आहे.

Latest News