पिंपरी-चिंचवडमध्ये सर्व सोयी सुविधायुक्त मराठवाडा भवन उभारणीला लवकरच सुरुवात : उद्योजक अरुण पवार

IMG-20221008-WA0121

पिंपरी-चिंचवडमध्ये सर्व सोयी सुविधायुक्त मराठवाडा भवन उभारणीला लवकरच सुरुवात : उद्योजक अरुण पवार

पिंपरी-चिंचवडमधील मराठवाडावासियांच्या दसरा स्नेह मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसादपिंपरी चिंचवड शहर परिसरात मराठवाडा वासीयांचे मोठ्या संख्येने वास्तव्य आहे. मराठवाडा वासियांना हक्काचे व्यासपीठ असावे, या उद्देशाने पिंपरी चिंचवडमध्ये येत्या काही दिवसात सर्व सोयी सुविधायुक्त मराठवाडा भवन उभारणीला सुरुवात करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष व उद्योजक अरुण पवार यांनी केले.

मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पिंपरी-चिंचवड परिसरातील मराठवाडावासियांच्या दसरा स्नेह मेळाव्याचे शाहुनगर येथे आयोजन करण्यात आले होते. स्त्री शक्तीचा गौरव म्हणून स्त्रियांच्या हस्ते उद्घाटन करून अमर जवान स्मारक प्रतिकृतीला मानवंदना देण्यात आली. मराठवाडा जनविकास संघ व मराठवाडा भूमिपुत्र पिंपरी-चिंचवड शहर संस्थेच्या वतीने या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

पिंपरी चिंचवड शहर परिसरातील मराठवाडावासिय मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विशेष म्हणजे या मेळाव्यात कुणाचाही सत्कार करण्यात आला नाही. भारतीय बैठक मारून गप्पांचे फड रंगले होते. एकप्रकारे विचारांची देवाणघेवाण करण्यात आली. दरम्यान, पिरॅमिड हॉलमध्ये मराठवाडा मुक्तीसंग्रामाच्या माहितीचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे आयोजन नितीन चिलवंत व जीवन बोराडे यांनी केले होते.

या स्नेहमेळाव्याला मराठवाड्याचे भुमिपुत्र या नात्याने पिंपरी चिंचवड शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. भाजपचे माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष व उद्योजक अरुण पवार, व्यंकटराव शिंदे, गोरख भोरे, बाळासाहेब काकडे, सुर्यकांत कुरुलकर, मालोजी भालके, आण्णा मोरे, नरेंद्र माने, गोपाळ माळेकर, सत्यजित चवधरी, प्रशांत जाधव, डी. एस. राठोड, अभिमन्यु पवार, प्रल्हाद लिपने, तुकाराम गोंगाने, सुनील भोसले, जीवन बोराडे, चिलवंत, सतीश काळे, रामहारी केदार, मुंजाजी भोजने, मारुती बानेवार, शिवकूमार बायस, गणेश खरात, विजय घोडके, राजेंद्र गाडेकर, मनोज मोरे, प्रियंका बोराडे, रेश्मा चिलवंत, सुजाता पानपट, शिल्पा बोराडे, सारिका शिंदे, डॉ. प्रीती काळे, वैशाली बोराडे, गीतांजली बोराडे आदी उपस्थित होते. स्नेह मेळाव्यात तीन ठराव संमत करून घेण्यात आले. ते पुढीलप्रमाणे : १) शहिद भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांच्या बलिदान दिना दिवशी (२३ मार्च २०२३) नवी दिल्ली येथे देशभक्तीवर आधारीत मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करणे.

२) मराठवाडा मुक्ती संग्राम ७५ व्या वर्षा निमित्त १७ सप्टेंबर २०२३ रोजी बालेवाडी स्टेडियम येथे ७५ हजार नागरिकांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करून मानवंदना देणे व देशभक्तीपर कार्यक्रमांनी मराठवाडा मुक्तीसंग्राम साजरा करणे.३) पिंपरी चिंचवड महानगरात सर्व सोयी सुविधायुक्त मराठवाडा भवन उभा करणे.

Latest News