निवडणूक आयोगाने दिलेला हा निर्णय आगामी अंधेरी-पूर्व पोटनिवडणुकीपुरताच…


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – शिवसेना कुणाची या वादाबाबत सुनावणी निवडणूक आयोगात सुरू आहे. त्यामुळे आगामी अंधेरी पोटनिवडणुकीत कोणताच पक्ष किंवा गट या चिन्हाचा वापर करू शकणार नाही. चिन्हासंदर्भातला अंतिम निर्णय निवडणूक आयोगाने अजूनही राखून ठेवला आहे
.एकनाथ शिंदेंनी बंड पुकारलं आणि शिवसेनेत शिंदे आणि ठाकरेंचे दोन गट पडले. बंड तर झालं पण शिवसेनेचं नाव आणि निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावरून रस्सीखेच सुरू झाली. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्ह मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात कायदेशीर लढाई सुरू होती.
सर्वोच्च न्यायालयात गेलेली ही लढाई केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दरबारात पोहोचली आणि आणि आता याबाबत अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर येतीये.केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा झटका दिला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचं निवडणूक चिन्ह असलेलं धनुष्यबाण तर गोठवलंच पण आता दोन्ही गटांना शिवसेना हे नाव देखील वापरता येणार नाही.मात्र, निवडणूक आयोगाचा हा निर्णय तात्पुरत्या स्वरूपाचा आहे. अंधेरी पोटनिवडणूक 3 नोव्हेंबर रोजी होणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेला हा निर्णय आगामी अंधेरी-पूर्व पोटनिवडणुकीपुरताच लागू असणार आहे