तात्पुरता का होईना निवडणूक चिन्ह गोठवलं, अत्यंत दुःखदायक- एकनाथ खडसे


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –
सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी जी मेहनत केली आणि धनुष्यबाणाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. ज्या धनुष्यबाणाच्या जोरावर या महाराष्ट्रात अनेक सत्ता केंद्रावर शिवसेनेने सत्ता काबीज केली. महाराष्ट्र सरकार मध्ये मुख्यमंत्री म्हणून ही त्यांचे मुख्यमंत्री झाले आणि वर्षानुवर्षाची जी पुण्याई होती ती दोघांच्या भांडणामध्ये गोठवली गेली. मला वाटत यापेक्षा दुर्दैवी प्रसंग नसावा.निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह गोठवल त्याबद्दल खडसे यांनी आपले मत मांडले,
वाडवडीलानी आयुष्यभर जे कमावलं ते एका मिनिटांमध्ये मुलांनी घालवलं.आयुष्यभर सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांनी जी मेहनत केली आणि धनुष्यबाणाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. त्यांची वर्षानुवर्षाची पुण्याई दोघांच्या भांडणामध्ये गोठवली गेली. मला वाटत यापेक्षा दुर्दैवी प्रसंग नसावा. वाडवडीलांनी आयुष्यभर जे कमावलं ते एका मिनिटांमध्ये मुलांनी घालवले. त्याला कोण जबाबदार आहे, कोण नाही हे निवडणूक आयोगाचा निर्णय आल्यावर समजेल.
परंतु तात्पुरता का होईना निवडणूक चिन्ह गोठवलं हे अत्यंत दुःखदायक क्लेशदायक गोष्ट आहे विधानपरिषदेचे आमदार एकनाथ खडसे आणि काँग्रेस आमदार शिरीष चौधरी हे डोंबिवलीतील आनंद कल्याणकारी सामाजिक संस्था यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात आले होते.
यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्याला कोण जबाबदार आहे. कोण नाही हे निवडणूक आयोगाचा निर्णय आला तर समजेल मात्र निवडणूक चिन्ह तात्पुरता का होईना गोठवलं हे अत्यंत दुःखदायक क्लेशदायक गोष्ट आहे
रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंग प्रकरणात क्लिन चिट मिळाली आहे, यावर खडसे म्हणाले, या केसच भवितव्य आता अंधारात आहे. रश्मी शुक्ला ज्या दिवशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटल्या त्याच दिवशी रश्मी शुक्लाना क्लिन चिट मिळेल, अस वाटलं होतं. फोन टॅपिंगसाठी मदत करत असताना त्या ठिकाणी त्या प्रमुख होत्या. माझा ही फोन 68 दिवस टॅप करण्यात आला. कोणत्या कारणासाठी माझा फोन टॅप करण्यात आला. याची मला अजूनही कल्पना देण्यात आलेली नाही. एफआयआर दाखल झालेला आहे. चौकशी सुरू आहे असं सांगण्यात येत. रश्मी शुक्ला त्या कालखंडात प्रमुख होत्या म्हणून त्यांना जबाबदार धरण्यात आलं होतं. आता त्यांना क्लिन चिट दिली आहे , त्यामुळे या केसच भवितव्य आता अंधारात आहे
काँगेसचे रावेर येथील आमदार शिरीष चौधरी हे निवडणूक आयोगाने शिवसेनेचे चिन्ह गोठवले आहे त्यावर आपली प्रतिक्रिया देताना म्हणाले की, केंद्राच्या यंत्रणांनी कायदा नियम आणि घटनेचा चोळामोळा करायचे ठरवलेच आहे, तर काय बोलायचं. एवढेच मला एक सामान्य माणूस म्हणून वाटते. राजकीय व्यक्ती म्हणून नाही. या देशाची घटना, स्वायत्त यंत्रणा देखील चोळामोळा करून पायाखाली रगडायची आहे. हे काम जर चाललेल असेल तर देशाच्या जनतेने याचा विचार करावा, असे ते म्हणाले.