भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयातील*फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचे उदघाटन


भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयातील* *फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचे उदघाटन
–पुणे :भारती अभिमत विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (ए.आय.सी.टी.ई)च्या ट्रेनिंग अँड लर्निंग अकँडमी(अटल )यांच्या सहयोगाने आयोजित फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅमचे उदघाटन सी-डॅक च्या संशोधन विभागाचे वरिष्ठ संचालक डॉ. एन. सुब्रमणियम यांच्या हस्ते आणि प्राचार्य डॉ. विदुला सोहोनी यांच्या उपस्थितीत झाले. राष्ट्रीय पातळीवरील हा प्रशिक्षण कार्यक्रम ३१ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आला आहे. डॉ. सुनीता धोत्रे यांनी उदघाटन समारंभाचे प्रास्ताविक केले . डॉ. संदीप वांजळे यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाची माहिती दिली. देशभरातील अभियांत्रिकी महाविद्दयालयातील ५० प्राध्यापक सहभागी झाले आहेत. प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना डॉ.एन.सुब्रमणियम म्हणाले,’डेटा ‘ वाढत असून त्यावर काम करणारी ऍप्लिकेशन देखील डिजिटल डोमेनमध्ये वाढत आहेत.२०२५ पर्यंत डेटाची व्याप्ती १८० झिटा बाईटपर्यंत जाईल. या डेटाचे विश्लेषण करायला १५० ट्रिलियन गिगाबाईट रिअल टाइम डेटा लागेल आणि प्रचंड बुद्धिमत्तेची गरज लागेल.त्याची तयारी ठेवावी लागेल. ‘डॉ.सोहोनी म्हणाल्या ,’फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम मधून ज्ञान वृद्धीचे काम होते. प्रचलित औद्योगिक आणि शैक्षणिक प्रवाहांची माहिती अद्ययावत करण्यासाठी या प्रशिक्षण कार्यक्रमांचा उपयोग होतो .डेटा सायन्स बद्दल सखोल अभ्यास करण्यासाठीची दिशा या प्रशिक्षण कार्यक्रमातून तयार होईल