पुणे शहरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी BRT मार्गच बंद करा :पोलिस आयुक्त


पुणे : ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –
पुणे शहरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी शहरातील बीआरटी मार्ग बंद करा, अशा मागणीचं पत्र पोलीस आयुक्त यांनी महापालिका आयुक्तांना लिहले आहे. यापूर्वीच शहराची वाहतूक समस्या अधिरच बिकट बनली आहे. यासाठी शहरात येणाऱ्या जड वाहनांना बंदी घालावी, पोलिसांकडून गर्दीच्या ठिकाणी वाहतूक नियमन व्हावे, अशी मागणी महापालिकेने पोलिसांकडे केली होती आता पोलीस आयुक्तांनीच थेट पुणे महापालिकेला पत्र लिहले आहे
. शहरातील वाहतूक कोंडी कमी करायचे असेल तर सर्व बीआरटी मार्ग बंद करा, तसेच अनावश्यक सायकल ट्रॅक काढून टाकावे, असे पत्रच महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना पाठवले आहे. नगर रस्ता, सातारा रस्ता तसेच सोलापूर रस्त्यावरील बीआरटी बंद करण्याची सूचना पोलीस आयुक्तांनी केली आहे.
यामुळे आता नवा वाद उफाळून येण्याची चिन्हे दिसत आहेत.वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि सार्वजनिक वाहतूक अधिकाधिक सक्षम यावी हा हेतू डोळ्यासमोर ठेवून पुणे महानगर पालिकेने बीआरटी योजना राबवण्यास सुरूवात केली.
यासाठी पालिकेकडून आजपर्यंत करोडो रूपयांचा निधी खर्च करण्यात आला. योजना पूर्णत्वास गेली नाही, मात्र काही प्रमाणात, काही मार्गांवर बीआरटी रूट कार्यान्वित आहे. मात्र आता पोलिस आयुक्तांच्या एका पत्राने बीआरटीबाबत पुन्हा एकादा चर्चा सुरू झाली आहे. बीआरटी मार्गच बंद करण्यात यावे, अशी मागणी पोलिस आयुक्तांनी केली.