मुख्य नेत्यांनी शांत राहायचं आणि इतरांना बोलायला लावायचं, ही पद्धत बंद झाली पाहिजे….फडणवीस

मुंबई (परिवर्तनाचा सामना ). शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कटुता संपवूया, या भूमिकेचं स्वागत करतो, लवकरच फडणवीसांची भेट घेणार असल्याचे सांगितले होते. यावर आता फडणवीस यांनी राऊत यांच्या विधानाबाबतीत प्रतिक्रीया दिली
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “संजय राऊत यांनी भेट मागितली तर नक्की भेट देणार. राजकारणतील कटुता दूर करायची असेल तर, सगळ्यांना मिळून ठरवावं लागेल. कोणताही एक पक्ष हे दूर करू शकत नाही. मुख्य नेत्यांनी शांत राहायचं आणि इतरांना बोलायला लावायचं, ही पद्धत बंद झाली पाहिजे.
पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेची मुलुखमैदान तोफ संजय राऊत सुमारे शंभर दिवसानंतर काल (बुधवारी) आर्थर रोड कारागृहाबाहेर आले. त्यानंतर त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. आज सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याचं कौतुक केलं
जेलमधून सुटल्यानंतर लोक मला विसरुन जातील, असे वाटलं होते. पण कालपासून जनता माझे स्वागत करीत आहेत. जे भोगायचे होते ते मी भोगलं आहे. जेलमध्ये मला वर्तमानपत्र वाचण्याची संधी मिळत होती, तेव्हा शिंदे-फडणवीस सरकारनं केलेली चांगली कामे वाचण्यात आली. म्हाडाकडून गरीबांना घरे देण्याचा सरकारचा निर्णय चांगला आहे,”
राज्याचा कारभार फडणवीस चालवित आहेत, असा टोला राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी लगावला. राज्यात सध्या खालच्या पातळीवर राजकारण सुरु आहे, मी लवकरचअ ध्यक्ष शरद पवार, शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. पवारांनी मला फोन केला, त्यांनी माझ्याविषयी काळजी व्यक्त केली होती. अनेकांचे फोन येत आहेत. तरुगांत राहणं कठिण गोष्ट आहे, मी यंत्रणेला दोष देणार नाही. माझी कुणाविषयीही तक्रार नाही. माझ्याविरोधात षडयंत्र करणाऱ्यांना आनंद झाला असेल, तर मी त्यांच्या आनंदात सहभागी आहे,”
“काही निर्णय राज्य सरकारने चांगले घेतले. मी त्यांचे स्वागत करतो. विरोधासाठी विरोध नाही करणार. ज्या गोष्टी राज्यासाठी आणि जनतेसाठी चांगल्या होतात. त्याचे स्वागत केले पाहिजे. अनेक निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगले घेतले”, असेही राऊत यांनी म्हटले.
राऊत म्हणाले, ” महाराष्ट्राच्या राजकारणातील कटुता कमी झाली पाहीजे, या फडणवीसांच्या वक्तव्याचे मी स्वागत करतो. महाराष्ट्रात सर्वच नेते एकमेकांशी सातत्याने भेट घेत असतात. मीदेखील देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचीही लवकरच भेट घेणार आहे. माझी सुटका झाल्याने देशाच्या न्यायव्यस्थेवरील आपला विश्वासही वाढला आहे,
31 जुलै रोजी संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती. यांना कथित पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतरपासून संजय राऊत हे आर्थर रोड कारागृहात होते. नेहमीच विरोधकांवर तुटून पडणारे राऊत आजच्या पत्रकार परिषदेत मवाळ झाल्याचे त्यांच्या बोलण्यावरुन दिसले.
त्यांची नेहमीची आक्रमक शैली आज दिसली नाही.“तरुंगामध्ये होतो. तीन महिन्यानंतर हाताला घड्याळ लावले. तरुंगामध्ये घड्याळ घालण्यास बंदी आहे. तरुंगात राहणे चांगली गोष्ट नाही. कोणाला वाटत असेल की, लोक मजा-मस्ती राहतात, तर तसे नाही. तरुंगात खुप राहणे खूप कठीण असते. म्हणूनच तरुंगाची कल्पना तयार करण्यात आली आहे, असे राऊत म्हणाले.