एकाचं व्यक्तीला वेगवेगळ्या नावाने नोटिसा बजावल्या, पाणी पुरवठा विभागाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर…

पुणे :. पाणी पुरवठा विभागाने ठेकेदार कंपनीने केलेल्या सर्वेक्षणाचा आधार घेत नोटिसा बजावण्यास सुरवात केली आहे.समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पुणे महापालिकेने सोसायट्यांना नोटिसा बजावून थेट कारवाईचा इशारा दिला.त्यामुळे पुण्यात वाद निर्माण झाला आहे, एका व्यक्तीला वेगवेगळ्या नावाने चार नोटिसा बजावल्या आहेत. अशा अनेक चुका झाल्याने पाणी पुरवठा विभागाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे

समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत pune महापालिकेने १ लाख मीटर बसवले आहेत. त्यापैकी ९० हजार मीटरचा दैनंदिन पाणी वापर किती आहे याची माहिती संकलित केली आहे. त्यामध्ये ८ हजार ग्राहकांनी जास्त पाण्याचा वापर केल्याचे समोर आले आहे. आत्तापर्यंत ४ हजार ६०० जणांना महापालिकेने नोटीस बजावली आहे.’

त्यात चुका असतील तर त्या सुधारल्या जातील’ असे सांगून महापालिका प्रशासनाने याप्रकरणी सारवासारव केली आहे. समान पाणी पुरवठा योजनेचे काम अद्यापही अर्धवट आहे. ३ लाख १८ हजार पैकी केवळ १ लाख मीटर बसले आहेत. या योजनेचे काम पूर्ण होण्यास अजून किमान एक वर्ष लागणार आहे.

.प्रति दिवस प्रतिमाणसी १५० पर्यंत पाणी वापरता येते, पण त्यापेक्षा जास्त  water वापर होत आहे. हे सार्वजनिक संपत्तीचे नुकसान असल्याने कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यामुळे पाणी वापर कमी करा असे महापालिकेने नोटिशीमध्ये नमूद केले आहे.सोसायटीचे अध्यक्ष, वॉचमन, इतर कामगारांना चौकशी करून ती निश्‍चीत केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जास्त नागरिक राहत असूनही त्यांची कमी नोंद झाली आहे

सदोष माहिती

प्रतिव्यक्ती १५० लिटरपेक्षा जास्त पाणी वापरले म्हणून महापालिकेने सोसायट्यांना नोटिसा बजावून थेट कारवाईचा इशारा दिला. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे नागरिकांमध्ये संताप निर्माण झालेली. त्यातच आता प्रत्येक सोसायटीमध्ये किती फ्लॅट आहेत किती लोक राहतात ही माहिती सदोष असल्याचे सांगण्यात येत आहे.

चौकशी करणार

“कोणत्या सोसायटीमध्ये किती फ्लॅट आहेत, किती लोक राहतात याची जनगणनेप्रमाणे माहिती नाही. पण सोसायटीमध्ये चौकशी करून ही संख्या काढली आहे. त्यामुळे त्यात चुका असतील तर त्या सुधारल्या जातील,’’असे पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी सांगितले.

Latest News