सणासुदीच्या दिवसातील योगदानाबद्दल पोलिसांचा सत्कार* ——————-पूना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेसकडून  आयोजन

*सणासुदीच्या दिवसातील योगदानाबद्दल पोलिसांचा सत्कार* ——————-
पूना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेसकडून  आयोजन

पुणे :

पूना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अँड आंत्रप्रुनरशिपच्या वतीने दिवाळी आणि सणासुदीच्या काळात दिलेल्या योगदानाबद्दल पोलिसांचा सत्कार करण्यात आला.लष्कर पोलिस ठाण्याच्या ७० कर्मचाऱ्यांच्या टीमसोबत दिवाळी साजरी करण्यात आली आणि फराळाचे वाटप करण्यात आले.

आसपासच्या परिसराचे रक्षण करण्यासाठी, रस्त्यांवर विशेषत: सणासुदीच्या वेळी, सामान्य लोकांना आनंद घेता यावा यासाठी त्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.या कार्यक्रमाला  वरिष्ठ पोलीस निरीक्षक  अशोक कदम,  पोलीस निरीक्षक  सौ.प्रियांका शेळके उपस्थित होते.

   पूना इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस अँड आंत्रप्रुनरशिपच्या  प्रभारी संचालक  डॉ. पोरीणिता बॅनर्जी  यांच्या  मार्गदर्शनाखाली डॉ. वसीमराजा सईद यांनी  यशस्वी आयोजन केले .महाविद्यालयाचा प्राध्यापक आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

Latest News