पोलिसी बळाचा वापर करीत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक…

मुंबई -ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –

प्रेक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनीं आज जितेंद्र आव्हाड यांना अटक केली आहे. यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी स्वत: ट्विट करत माहिती दिली. हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही, असंही त्यांनी म्हटलंय.

मी पोलीस स्टेशनला गेलो असताना त्यांनी मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं. त्यानंतर डीसीपी राठोड हे पोलीस स्टेशनला आले. त्यांच्या डोळ्यांत आणि चेह-यावरती अस्वस्थपणा दिसत होता. हतबलता दिसत होती. ते आदराने म्हणाले कि, मी काही करु शकत नाही. वरुन आदेश आले आहेत. तुम्हांला अटक करावी लागेल, असंही ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय

आज दुपारी साधारण 1 वाजता मला वर्तकनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. निकम यांचा फोन आला आणि नोटीस घेण्यासाठी मी माणूस पाठवतो नाहीतर तुम्ही पोलीस स्टेशनला या असे ते म्हणाले. मी मुंबईला जायला निघालो होतो. मी म्हटलं कि, मी पोलीस स्टेशनला येतो आणि नंतर मी मुंबईला जातो, अस सांगितले

Latest News