राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषींची सुटका करण्याचे आदेश…


नवी दिल्ली ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –
तामिळनाडू सरकारने सर्व दोषींना सोडण्याची शिफारस केली आहे, ज्यावर राज्यपालांनी कारवाई केली नाही. दोषींनी तीन दशकांहून अधिक काळ तुरुंगात घालवला असून तुरुंगातील त्यांची वागणूक समाधानकारक असल्याचंही खंडपीठाने म्हटलं आहे.
न्यायमूर्ती एल नागेश्वर यांच्या खंडपीठाने कलम 142 चा वापर करून हा आदेश दिला माजी पंतप्रधान राजीव गांधी हत्या प्रकरणातील सर्व 6 दोषींची सुटका करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, जर राज्यपाल कारवाई करत नसेल तर आम्ही कारवाई करत आहोत.या प्रकरणातील दोषी नलिनी श्रीहर, रॉबर्ट पेस, रविचंद्रन, राजा, श्रीहरन आणि जयकुमार यांना सोडण्याचे आदेश दिले आहेत.
न्यायमूर्ती बी.आर.गवई आणि बीव्ही नागरथना यांच्या खंडपीठाने 17 मे रोजी दिलेल्या निर्देशानंतर हा आदेश दिला.दरम्यान, 21 मे 1991 साली निवडणुकींच्या प्रचार रॅलीदरम्यान तामिळनाडूमध्ये आत्मघाती हल्ला घडवून आणत राजीव गांधींची हत्या करण्यात आली होती.
या प्रकरणात पेरारिवलनसह 7 जणांना आरोपी म्हणून दोषी ठरवण्यात आलं होतं. टाडा कोर्टाने आणि सर्वोच्च न्यायालयाने त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने दयेचा अर्ज स्वीकारत फाशीची शिक्षा रद्द करत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.