हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरवात…


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –
१२ जिल्ह्यांच्या हिमाचल प्रदेश राज्यात ४ लोकसभा मतदारसंघ आहेत. सध्या ४ ही खासदार हे भाजप पक्षाचे आहे. केंद्रीय मत्री अनुराग ठाकूर हे हिमाचल प्रदेशातील हमीरपूर मतदरासंघातील खासदार आहेत.
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर, माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचे पुत्र विक्रमादित्य सिंह आणि भाजपचे माजी प्रमुख सतपाल सिंह सत्ती यांच्यासह 68 मतदारसंघातील 412 उमेदवारांचे भवितव्य आज ठरवणार आहेत.
सफरचंदाच्या किमती मागील वर्षाच्या तुलनेत कमी झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा लाभांश कमी झाला आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न घटले. त्यामुळे हिमाचल मधील शेतकरी राजा नाराज आहे.हिमाचल प्रदेश हे छोटे राज्य आहे. त्यामूळेच तेथील लोकसंख्या ही विखुरलेली आहे आणि ती पर्वत भागांमध्ये राहते. बहुतांश विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदारांची संख्या ही एक लाखापेक्षा कमी आहे. अशा परीस्थितीत फार कमी मतांच्या फरकाने उमेदवाराचा विजय होतो.
एक किंवा दोन हजार मतदानामुळे निवडणुकीचा निकाल वेगळा लागू शकतो. सर्व ६८ जागांवर भाजप, कॉग्रेस, आप आणि स्थानिक पक्ष निवडणूक लढवत आहेत हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतदानाला आज (शनिवार) सुरवात झाली आहे.
एकूण 68 जागांपैकी किमान 25 जागांच्या निकालावर सफरचंद शेतकऱ्यांचा निकाल प्रभावी असण्याची शक्यता आहे या निवडणुकीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीकेंद्रीय गृहमंत्री अमीत शाह यांच्या सह राजनाथ सिंह, योगी आदित्यनाथ, प्रियांका गांधी, अरविंद केजरीवाल या दिग्गज नेत्यांनी प्रचार केला
हिमाचल प्रदेश पर्यटनाचं मुख्य राज्य म्हणून ओळखलं जात, शिमला,मनालीस कुलु, धर्मशाला, ही प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहेत. महाराष्ट्र राज्यासह दक्षिण भारतातील अनेक पर्यटक हिमाचलला जातात.निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, हिमाचल प्रदेशमध्ये एकूण 55,92,828 मतदार आहेत. यामध्ये 28,54,945 पुरुष तर 27,37,845 महिला मतदार आहेत. याशिवाय 38 तृतीयपंथी मतदारही मतदानाचा हक्क बजावणार आहेत. याआधी 2017 हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत 75.57 टक्के मतदान झाले होते.