आवाज दाबण्यापेक्षा सुषमा अंधारे यांच्या प्रश्नांची उत्तरे द्या…


मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या जनसंवाद यात्रेच्या ३२ व्या दिवशी मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी खुर्द, हरताळा येथे माजी महसूल मंत्री खडसे यांच्या अध्यक्षतेखाली व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहिणी खडसे खेवलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जनसंवाद सभा झाली. याप्रसंगी आमदार खडसे म्हणाले, की मतदारसंघात अनेक विकासकामे केली.राहिलेली विकासकामे करण्यासाठी कटिबद्ध आहोत. त्यासाठी आतापर्यंत जशी साथ दिली ती साथ कायम राहू द्या, असे त्यांनी आवाहन केले.सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रय्तन करून दडपशाही केली जात आहे. त्यांच्याकडे जनता व विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत. त्यांनी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांची सभा रद्द करून विरोधकांचा आवाज दाबण्यापेक्षा सुषमा अंधारे यांच्या प्रश्नांची उत्तरे द्यायला हवी होती, असा आरोप एकनाथ खडसे यांनी सत्ताधारी नेते व मंत्र्यांवर केला आहेखडसे म्हणाले, गेली तीस वर्षे मतदारांच्या आशीर्वादाने या मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. तीस वर्षांत सर्व जाती धर्माला घेऊन सर्वसमावेशक विकासाचे राजकारण केले. राजकारण करताना कोणाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला नाही. परंतु आजकालचे राजकारण बदलले आहे. सत्ताधारी पक्ष विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. यातूनच मुक्ताईनगर येथे सुषमा अंधारे यांची सभा होऊ दिली नाहीया वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष, माफदा राज्याध्यक्ष विनोद तराळ, यात्रा प्रमुख निवृत्ती पाटील, ईश्वर रहाणे, बंगालीसिंग चितोडिया, तालुकाध्यक्ष यू. डी. पाटील, युवक जिल्हा उपाध्यक्ष पवन पाटील, माजी सभापती विलास धायडे, प्रदीप साळुंखे, समाधान कार्ले, यात्रा सह प्रमुख रामभाऊ पाटील, अतुल पाटील, जिल्हा परिषद सदस्य नीलेश पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.