केंद्र शासनाच्या “अर्बन आउटकम्स फ्रेमवर्क २०२२” उपक्रमाचे उदघाटन**सर्वेक्षण मोहिमेत नागरिकांनी सहभागी होण्याचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांचे आवाहन


केंद्र शासनाच्या “अर्बन आउटकम्स फ्रेमवर्क २०२२” उपक्रमाचे उदघाटन**सर्वेक्षण मोहिमेत नागरिकांनी सहभागी होण्याचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांचे आवाहन
*पिंपरी, दि.१० नोव्हेंबर २०२२: केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्यावतीने राबविण्यात येणा-या दुस-या टप्प्यातील “अर्बन आउटकम्स फ्रेमवर्क २०२२” या उपक्रमाचे मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाचे सचिव मनोज जोशी, सहसचिव (स्मार्ट सिटीज मिशन) कुणाल कुमार यांच्या उपस्थितीत नवी दिल्लीत (ऑनलाईन) उदघाटन कार्यक्रम पार पडला. या ऑनलाईन कार्यक्रमावेळी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त तथा स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, सह मुख्य कार्यकारी अधिकारी किरणराज यादव, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, कंपनी सेक्रेटरी चित्रा पंवार, कार्यकारी अभियंता (वाहतुक विभाग) बापूसाहेब गायकवाड यांच्यासह अधिकारी – कर्मचारी उपस्थित होते. ट्रान्सपोर्ट फॉर ऑल चॅलेंजच्या पहिल्या टप्प्यात देशातील १३० शहरांनी सहभाग घेतला होता. यापैकी केवळ ४६ शहरांची निवड करण्यात आली. या निवडक शहरांमध्ये पिंपरी चिंचवडचा देखील समावेश आहे. पहिल्या टप्प्यातील सर्वेक्षण दरम्यान आढळलेल्या समस्या आता दुसऱ्या टप्प्यात सोडविण्याचा प्रयत्न याद्वारे करण्यात येणार आहे. यामध्ये स्टार्टअप प्रोग्रामचाही समावेश करण्यात आला आहे. पिंपरी चिंचवड शहराला स्मार्ट सिटी बनविण्याच्या दृष्टीने सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्यांच्या दैनंदिन जीवनमानावर दुरगामी, सकारात्मक परिणाम करणा-या शाश्वत विकासाची प्रक्रिया उत्तम प्रकारे राबविण्यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. या धोरणाला अनुसरून केंद्र शासनाच्या “अर्बन आउटकम्स फ्रेमवर्क २०२२” या उपक्रमांतर्गत शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने शहरात विविध उपक्रम आणि योजना राबविल्या जात आहेत. तसेच केंद्रीय गृहनिर्माण आणि शहर विकास मंत्रालयाद्वारे भारतातील शहरांमधील ऑनलाईन नागरी सुविधांची उपलब्धता आणि वापर समजून घेण्यासाठी सिटीझन परसेप्शन सर्वेक्षण करण्यात येत आहे.अर्बन आउटकम्स फ्रेमवर्क २०२२ हा उपक्रम दि. ९ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर २०२२ या दरम्यान राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये शहरातील नागरिक, विद्यार्थी, सामाजिक संस्था, गृहनिर्माण संस्था, शाळा, महाविद्यालये आणि विविध आस्थापना यांचा सहभाग अपेक्षित आहे. अर्बन आउटकम्स फ्रेमवर्क २०२२ हा उपक्रम जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचावा, यासाठी संपूर्ण शहरामध्ये वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये रॅली, पथनाट्य, वॉल ग्राफिटी, स्पर्धा, सर्वेक्षण अशा कार्यक्रमांचा समावेश आहे. अर्बन आउटकम्स फ्रेमवर्क २०२२ हा उपक्रम जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचावा, यासाठी पीसीएमसी स्मार्ट सारथी मोबाईल अॅप आणि सोशल मिडिया चॅनेल्स या माध्यमातून जनजागृती करून सदर उपक्रम राबविण्यात येणार असून https://eol2022.org/ लिंकद्वारे नागरिकांनी उपक्रमात सहभागी होवून आपला अभिप्राय नोंदवावा, असे आवाहन आयुक्त् शेखर सिंह यांनी केले आहे.