‘ विवेक शलाका, विवेक रत्नाकर ‘चे १९ नोव्हेंबर रोजी प्रकाशन

‘ विवेक शलाका, विवेक रत्नाकर ‘चे १९ नोव्हेंबर रोजी प्रकाशन
………………………

नव्या वर्षासाठी विवेकानंदांच्या विचारांची डायरी आणि कॅलेंडर !

विवेकानंद केंद्र प्रकाशन विभागाचा उपक्रम

पुणे :

‘विवेक शलाका २०२३ (दिनबोधिनी-डायरी), विवेक रत्नाकर २०२३(कार्य दर्शिका-कॅलेंडर) ‘ चे प्रकाशन शनीवार,दि. १९ नोव्हेंबर रोजी पुण्यात होणार आहे.उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत.त्यांच्या हस्ते तसेच रामकृष्ण मठ(पुणे)चे अध्यक्ष श्रीकांतांनंद महाराज,’आपलं घर’ संस्थेचे संस्थापक विजय फळणीकर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम ज्योत्स्ना भोळे सभागृह(हिराबाग ) येथे सायंकाळी ६ वाजता होणार आहे.

‘विवेकानंद केंद्र कन्याकुमारी मराठी प्रकाशन विभागा’चे सचिव सुधीर जोगळेकर, विवेकानंद केंद्राचे महाराष्ट्र प्रांत प्रमुख अभय बापट यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

‘विवेक रत्नाकर ‘या कॅलेंडरचा विषय स्वामी विवेकानंद यांचे वास्तव्य झालेल्या सहा वास्तूंवर, तिथे उभारण्यात आलेल्या स्मारकांवर आधारित आहे.हाच धागा पकडून श्रीकांतानंद हे विवेकानंदांच्या तेव्हाच्या महाराष्ट्रातील प्रवासावर बोलणार आहेत. प्रकाशन कार्यक्रम जिथे होतो आहे

, त्या हिराबागेत स्वामी विवेकानंद आले होते.१९ नोव्हेंबर हा दिवस एकनाथजी रानडे यांचा जन्मदिवस आहे,असेही या प्रकाशन कार्यक्रमाचे औचित्य आहे.

Latest News