भाजपसोबत जाऊ शकत नाही आमचे काही ऐतिहासिक मुद्दे आहेत.- प्रकाश आंबेडकर

मुंबई : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना -) भाजपसोबत जाण्यासदंर्भात खुद्द प्रकाश आंबेडकरांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आम्ही भाजपसोबत जाऊ शकत नाही. आमचे काही ऐतिहासिक मुद्दे आहेत. वैदिक हिंदू समाज रचनेबाबतं आमचं भाजपशी भांडण आहे. त्यावर त्यांनी आधी उत्तर दिलं पाहिजे. त्यामुळे आम्ही भाजपसोबत जाऊ शकत नाही, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलंय

.भाजपसोबत कोणी जात असेल तर आम्ही त्यांच्यासोबतही जाणार नाही. मग आमच्याकडे स्वबळावर लढण्याशिवाय पर्याय राहत नाही, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान असलेल्या दादर येथील राजगृहाला भेट दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी बाबासाहेबांचं ग्रंथालय, अभ्यासाची खोली, त्यांच्या वापरातील वस्तू आणि बाबासाहेबांच्या दुर्मिळ फोटोंचं प्रदर्शन पाहिलं. यानंतर एकनाथ शिंदेंनी प्रकाश आंबेडकरांची एक तास बंद दाराआड चर्चा केली

.या चर्चेदरम्यान आंबेडकर स्मारकवरही चर्चा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर प्रकाश आंबेडकर शिंदे गट आणि भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे

Latest News