ST: सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता लागू

मुंबई :(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ) – ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – एसटी कामगार संघटनांसह एसटी कर्मचारी आपल्या मागण्या मान्य व्हाव्या यासाठी अनेक दिवसांपासून आवाज उठवत होते. महाविकास आघाडी सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यासाठी मोठा संपही पुकारला होता. त्यावेळी एसटीचे विलीनीकरण व्हावे, यासाठी कर्मचारी आक्रमक झाले होते. त्यावेळी विलीनीकरणासह अनेक मागण्यांपैकी सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता लागू करण्याची मागणीही कर्मचाऱ्यांची होती. ती आज अखेर मान्य झाली असून शिंदे-फडणवीस सरकारने याची घोषणा केली आहे.

शिंदे-फडणवीस सरकारने एसटी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. सरकारने एसटी कर्मचाऱ्यांसाठी ३४ टक्के महागाई भत्ता जाहीर केल्याने एसटी कर्मचाऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.दरम्यान, याबाबतचे पत्र देखील एसटी महामंडळाला राज्य सरकारकडून देण्यात आले आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना ‘अच्छे दिन’ येणार आहेत दरम्यान, st कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता देण्याचा निर्णय अनेक दिवसांपासून रखडला होता. यावर निर्णय होत नव्हता. त्यामुळे एसटी कामगार संघटना आक्रमक झाल्या होत्या. पण आज कर्मचाऱ्यांच्या मागणीला यश आले आहे.

आता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना देखील ३४ टक्के महागाई भत्ता मिळणार आहे. याआधी एसटी कर्मचाऱ्यां २८ टक्के महागाई भत्ता मिळत होता.

Latest News