राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महापुरुषा बद्दल खालच्या पातळीवर वक्तव्य केले, तेव्हा आजचे आंदोलन करणारे लोक तेव्हा शांत का ,: आमदार रोहित पवार

पुणे.ऑनलाईन परिवर्तनाचा सामना -राजकारणाचा फायदा घेण्यासाठी थोर व्यक्तींना राजकीय चष्म्यातून पाहता की काय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला असल्याचे आमदार रोहित पवार यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले

. रोहित पवार म्हणाले की, जेव्हा हर हर महादेव चित्रपटात शिवरायांच्या बाबतीत खोटा इतिहास दाखविला गेला. कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोठ्या पुतळ्याचा अवमान झाला. आज आंदोलन करणारे लोक त्यावेळी गप्प का बसले होते, याचे आश्चर्य व खंत आहे.

राहुल गांधी यांनी दाखविलेल्या पत्रात काय लिहिले होते. सावरकर यांनी लिहिलेल्या पुस्तकातील शब्द आणि शब्द समजून घेणे आवश्यक आहे. युवा पिढीला सावरकरांचा इतिहास समजला पाहिजे. यात राजकारण बाजूला ठेवणे आवश्यक आहे. राहुल गांधींचा विरोध कमी होत आहे. भाजप, शिंदे गट आणि मनसे यामध्ये राजकारण करीत आहेत. उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरु आहे.

: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बाबतीत खालच्या पातळीवर वक्तव्य केले, तेव्हा आजचे आंदोलन करणारे लोक का शांत बसले होते, असा सवाल आमदार रोहित पवार यांनी भाजपसह  शिंदे गट  आणि ‘मनसे’ला केला आहे

सावरकरांच्या बाबत काही बोलणार नाही. त्यांच्याबाबतचा माझा अभ्यास खरंच कच्चा आहे. अभ्यास नक्कीच करावा लागेल. मात्र, याबाबत चर्चा झाली पाहिजे. शाहू, फुले, आंबेडकरांचा कोणताही विषय आला, तरी आपण त्यांचा इतिहास माहिती असल्याने लढतो. हे लढत नाहीत, ती गोष्ट वेगळी आहे. त्यामुळे सावरकर यांच्याबाबतचा खरा इतिहास समजला पाहिजे माझ्या मतदारसंघात केवळ मला श्रेय मिळू नये, यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा विकास आराखडा, राशीनच्या देवीचा आराखडा आदी धार्मिक, विविध महत्वाच्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे.

जामखेडच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेला विरोधकांच्या सांगण्यावरुन स्थगिती देण्यात आली आहे. सगळ्यात राजकारण पाहण्यापेक्षा लोकांचे हित पहा. लोक आता दुटप्पी राजकारण सहन करणार नाहीत. येत्या काळात लोक शांत राहणार नाहीत, असा इशाराच रोहित पवार यांनी दिला.

Latest News