स्वातंत्र्यवीर सावरकर, ती पत्रं खरी, पण ते माफीनामा, नव्हे अवेदन पत्रं:सात्यकी सावरकर

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलंय. ती पत्रं खरी आहेत. पण त्या पत्रांना माफीनामा म्हणणं चुकीचं आहे. तो माफीनामा नाही तर अवेदन पत्रं आहेत.

सावरकर जेव्हा अंदमानात गेले होते. तेव्हा त्यांना कोणत्याच सुविधा दिल्या गेल्या नाहीत. एका कोठडीत त्यांना बंद करून ठेवलं होतं. सामान्य बंदी केलेल्या लोकांना दिलेल्या सुविधा मला मिळाव्यात त्यासाठी त्यांनी ती अवेदनं केली होती, असं सात्यकी सावरकर यांनी सांगितलं

राजकीय बंदिवानाला ज्या सुविधा दिल्या जातात त्याच सुविधा मिळाव्यात म्हणून त्यांनी अवेदनं केली होती. त्याचबरोबर सावरकर यांनी वेळोवेळी अवेदने केली होती. नंतर त्यांनी सुटकेसाठी अवेदनं केली होती. पण त्यात केवळ स्वता:ची नाही तर इतर जी क्रांतीकारक अंदमानात डांबली गेली आहेत, त्यांचीही सुटका करा अशी विनंती सावरकरांनी केली होती, असंही सात्यकी यांनी सांगितलं आहे.स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर राहुल गांधींनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर देशातील राजकारण चांगलंच तापलं आहे. सध्या राहुल गांधी भारत जोडो यात्रेवर आहेत. सध्या ही यात्रा महाराष्ट्रातील विविध भागांमधून पुढे – पुढे सरकत आहे. या दरम्यान राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल वादग्रस्त विधान केले. त्यानंतर राज्यासह देशभरातील सावरकर प्रेमींनी राहुल गांधी आणि काँग्रेस विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

स्वा. सावरकर यांनी अंदमानातून सुटका करून घेण्यासाठी इंग्रजांची माफी मागितली होती. सावरकरांना इंग्रजांनी पेन्शनही दिली होती, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला होता. हा आरोप केल्यानंतर राहुल गांधी यांनी सावरकरांच्या माफीनाम्याचं पत्रंही जाहीरपणे पत्रकार परिषदेत दाखवलं होतं.

राहुल गांधींच्या आरोपामुळे भाजप, मनसे आणि शिंदे गट चांगलाच तापला होता. या पक्षांनी गेल्या तीन दिवसांपासून राहुल गांधींचा निषेध नोंदवत ठिकठिकाणी आंदोलने केली. भारत जोडो यात्रा बंद करण्याची मागणी करण्यात आली होती. दरम्यान, स्वत: सावरकर यांच्या वंशजांनीच ती कागदपत्रे खरी असल्याचे सांगून सर्व पक्षातील सावकरप्रेमींची कोंडी केली आहे

Latest News