”कोश्यारी” त्यांना कुठेतरी बाहेर पाठवा – शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- राज्यपालांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की, शिवाजी महाराजांचे विचार कधी जुने होणारे नाहीत. शिवाय त्यांची तुलना जगातल्या कोणत्याही महान व्यक्तीशी होऊ शकत नाही. केंद्रातल्या भाजप नेत्यांनी अशा राज्याचा इतिहास माहिती नसलेल्या व्यक्तीला राज्याच्या बाहेर कुठंही पाठवावं.” अशी मागणीच बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे.

त्यामुळे कोश्यारी प्रकरणावरुन शिंदे गट नाराज असल्याचं दिसून येत आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल दुसऱ्यांदा वादग्रस्त विधान केलं आहे. त्यामुळे शिंदे गट नाराज असल्याची शक्यता आहे. शिंदे गटातल्या एका आमदाराने यासंबंधी जाहीर भूमिका मांडली आहेएकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी कोश्यारी यांच्याविरोधात जाहीरपणे भूमिका घेतली आहे.

त्यांना कुठेतरी बाहेर पाठवा, अशी मागणी त्यांनी केलीय.औरंगाबाद येथे बोलतांना भगतसिंग कोश्यारी यांनी नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केली. ते म्हणाले की, तुम्हाला कुणी विचारलं की तुमचे हिरो कोण आहेत? तर बाहेर कुठे जायची गरज नाही. इथेच महाराष्ट्रात तुम्हाला ते मिळतील. शिवाजी तर जुन्या काळातले आहेत, मी नव्या युगाविषयी बोलतोय. डॉक्टर आंबेडकरांपासून डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला ते इथेच मिळतील. असं कोश्यारी म्हणाले. त्यानंतर राज्यभरामध्ये संताप व्यक्त होतोय.

Latest News