”लिपस्टिकवाली बाई” दिपाली सय्यद यांच्यावर निशाणा -चंद्रकांत खैरे


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- सुषमा अंधारे यांचं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षण झालेलं आहे. दसरा मेळाव्याला मी त्यांना सांगितलं तुमचं अप्रतिम भाषण झालं. त्यावेळी त्या म्हणाल्या, साहेब, तुम्ही शिवसेना प्रमुखांचा वाढदिवस साजरा करत होते. तुम्ही एकांकीका स्पर्धा भरवल्या होत्या. तेव्हा माझ्याकडे कॉलेजची फी भरायला पैसेही नव्हते. तेव्हा मी प्रचंड अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. मी दोन्ही स्पर्धेत भाग घेतला आणि दहा हजार रुपये पारितोषिक मिळवले, अशा या ताई आहेत. त्या लिपस्टिकवालीला काय समजतं? घेऊन फिरतील तिला. आता तिला पक्षात घेतही नाहीत ते, असा टोला त्यांनी लगावला.
माजी खासदार आणि ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी अभिनेत्री दिपाली सय्यद यांच्यावर निशाणा साधलाय. खैरेंनी दिपाली सय्यद यांचा उल्लेख लिपस्टिकवाली बाई असा उल्लेख केलाय. ते औरंगाबादमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलंय.दिपाली सय्यद यांनी सुषमा अंधारे आणि नीलम गोऱ्हे या चिल्लर नेत्या असल्याचं म्हटलं होतं. हाच धागा पकडून चंद्रकांत खैरे यांनी सय्यद यांच्यावर निशाणा साधला. एका लिपस्टिकवाल्या बाईने सांगितलं. सुषमा अंधारे आणि नीलम गोऱ्हेंकडे काहीच नाही. त्या मीडियाशी बोलल्या, असं चंद्रकांत खैरे म्हणालेदरम्यान, पावडर लावून आमच्याकडे येऊ नको. स्वत: मोठ्या मोठ्या घोषणा करायच्या. शिवसेना नेत्या. कसल्या नेत्या? बोलण्याचा अधिकार फक्त शिवसेना नेते आणि प्रवक्त्यांना अधिकार असतो, असंही खैरे म्हणाले.