पुण्यात २०२३ मध्ये जी-२० परिषदेमुळे महापालिकेने प्रमुख रस्त्यांचे पूर्ण डांबरीकरण करण्याचं नियोजन

पुणे 🙁 ऑनलाईन परिवर्तनाचा सामना )

– जी-२० परिषदेमुळे महापालिकेने प्रमुख रस्त्यांचे पूर्ण डांबरीकरण केले जाईल, तसेच सिमेंटच्या रस्त्यांवर सहा इंचाचा थर टाकला जाईल, त्यामुळे पुढची १० ते १५ वर्ष सिमेंटचे रस्ते व्यवस्थित राहतील असे सांगितले जात आहे.शहरातील सर्व रस्ते डांबरीकरण करण्यासाठी ५०० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. ही निविदा प्रक्रिया पूर्ण होत असताना आता दुसऱ्या टप्प्यातील पथ विभागाने ९८ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांसाठी २६० कोटी रुपयांचा खर्च काढला होता. त्यासंदर्भात आयुक्त विक्रम कुमार यांनी बैठक घेऊन यातील प्राधान्याने – आवश्‍यक आहे. अशाच रस्त्यांची यादी व खर्च सादर करण्याचे आदेश पथ विभागाला दिले.त्यानंतर खड्डे सिमेंट काँक्रिट किंवा डांबर टाकून बुजविण्यात आले, पण हे काम व्यवस्थित केले नसल्याने रस्ते खचले आहेत. त्याठिकाणी वारंवार सिमेंट व डांबर टाकल्याने रस्ते समपातळीत नाहीत. त्यामुळे वाहनचालकांचे कंबरडे मोडले आहे.

शिवाय शहरात कायम वाहतूक कोंडी होत आहे. महापालिका प्रशासनावर पुणेकरांनी संताप व्यक्त केल्यानंतर ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. पण शहरातील रस्त्यांची स्थिती अद्यापही खराबच आहे.

त्यानुसार मुख्य खात्याकडील ३० किलोमीटरच्या ३४ रस्त्यांचा समावेश आहे. यामध्‍ये धायरी, कोथरूड, औंध, कात्रज, हडपसर, नगर रस्ता यासह शहराच्या सर्व भागातील रस्ते आहेत. या कामासाठी १३० कोटीचा खर्च येणार आहे. तर, क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत येणारे १२ मीटरपेक्षा कमी रुंदीचे ७.८ किलोमीटरचे आहेत. त्यासाठी १२ कोटी रुपयांच्या खर्चास आयुक्तांनी मान्यता दिली आहे

.त्यामध्ये सर्वात खराब झालेले रस्त्यांना प्राधान्य दिले जात आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात ५० किलोमीटरच्या रस्त्यांसाठी १९३ कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी येत्या आठवड्यात निविदा उघडली जाणार आहे. शहरातील रस्ते दुरुस्तीसाठी १८० कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू असताना आखणी काही रस्त्यांचे डांबरीकरण केले जाणार आहे. त्यामध्ये ३८ किलोमीटरच्या रस्त्यांसाठी १४२ कोटी रुपयांचा निधी इस्टिमेट कमिटीमध्ये मंजूर करण्यात आला आहे.

Latest News