आदिवासींचं जीवन, संघर्ष पहिल्यांदा समजल्याशिवाय देश समजणार नाही : राहुल गांधीं


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-
गांधी म्हणाले, ”देशातील अनेक आदिवासी लोकं मला भेटल्यावर सांगतात, आमची जमीन हडप करत सरकार उद्योगपतींना देतेय. कोणत्याही कागदपत्रांची देवाणघेवाण न करता आम्हांला बेघर केलं जातंय. मात्र माझ्या कुटुंबाचं आदिवासी समाजाशी खूप जुनं आणि जवळचं नातं आहे. कारण माझी आजी मला नेहमी सांगायची आदिवासी हेच या हिंदुस्थानचे पहिले आणि खरे मालक आहेत. खरं तर या देशाला समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला आदिवासींचं जीवन, संघर्ष पहिल्यांदा समजून घ्यावा लागेल”,असं मत. काँग्रेस चे नेते राहुल गांधी यांनी मांडले आहें
आदिवासी न म्हणता वनवासी म्हणतात. कारण ते जंगलात राहतात. पण आदिवासींनी शहरात राहावं, इंजिनिअर, डॉक्टर, व्हावं, असं त्यांना वाटत नाही. आदिवासींनी कायम जंगलांत राहावं असंच त्यांना वाटतं. पण असंच सुरू राहीलं तर पुढच्या दहा वर्षात संपूर्ण जंगल उद्योगपतींच्या घशात जाईल. पणनेहमी आदिवासींबरोबर असंल्याचं गांधींनी यावेळी सांगितलंभाजपचे नेते आदिवासींना देशाचे मालक मानत नाहीत. तर ते आदिवासींना ‘आदिवासी’ न म्हणता ‘वनवासी’ म्हणतात. हाच काँग्रेस आणि भाजपमध्ये फरक असल्याचं काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी म्हटलंय
. काँग्रेसने आदिवासींना कायमच चांगलं शिक्षण, रोजगार, आरोग्य देण्याबरोबरच त्यांच्या सुरक्षेचीही जबाबदारी घेतली असल्याचं सांगत त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ते बोलत होते.
भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून मी तब्बल २००० किलोमीटर अंतर चाललो आहे. तर यापुढे अजून १५०० किलोमीटर अंतर चालायचं आहे. या यात्रेत माझ्यासोबत हजारो बेरोजगार, शेतकरी, आदिवासी लोकं चालताहेत. कारण या यात्रेत जातीपाती, प्रांत, भाषा असा कोणताही भेदभाव आम्ही करत नाही, तर फक्त आणि फक्त प्रेम जपतो, असं गांधी यावेळी म्हणाले.