ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – मी मुंबईकडे निघण्यासाठी गाडी पकडत असताना माझ्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी तिथे विनायक राऊत आणि नितीन देशमुख हे रेल्वे स्थानकावर 100 जणांसह उभे होते. त्यांनी कार्यकर्त्यांना चिथावण्याचे आणि माझ्या अंगावर पाठवण्याचे काम केलं. यामुळे माझा जीवही गेला असता. त्यामुळे विनायक राऊत आणि नितीन देशमुख यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे
. त्यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल होऊन अटक करण्यात यावी. तसेच याबाबत महिला आयोग, केंद्रीय गृहमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडेही तक्रार करणार आहे असेही गवळी यांनी यावेळी स्पष्ट केले
आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर निवडून आलो. त्यामुळे भाजपाबरोबर सत्ता स्थापन केली. खरे गद्दार कोण आहे हे सर्वांना दिसले आहे. आम्ही शिवसेना सोडली नसून बाळासाहेबांचे विचार देखील विकलेले नाही. आमचीच शिवसेना खरी असून आम्हीच बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललो आहोत म्हणून त्यांच्या पोटात दुखत आहे अशी घणाघाती टीकाही गवळींनी ठाकरे गटावर केली आहे.
महाराष्ट्र राज्य तुम्हाला सांभाळता आलं नाही आणि बिहार दौरा करायला निघाले. पहिले आपले घर सांभाळा नंतर बिहार दौरा करा अशी बोचरी टीका शिंदे गटाच्या खासदार भावना गवळी यांनी केली आहे.
तसेच तुम्ही आमच्यावर गद्दार, गद्दार म्हणून आरोप करता पण तुम्हालाच आम्हांला सांभाळता आलं नाही. त्यामुळे खरे गद्दार तर तुम्ही आहात असा हल्लाबोलही गवळी यांनी यावेळी केला आहे.आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर निवडून आलो. त्यामुळे भाजपाबरोबर सत्ता स्थापन केली. खरे गद्दार कोण आहे हे सर्वांना दिसले आहे. आम्ही शिवसेना सोडली नसून बाळासाहेबांचे विचार देखील विकलेले नाही. आमचीच शिवसेना खरी असून आम्हीच बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललो आहोत म्हणून त्यांच्या पोटात दुखत आहे अशी घणाघाती टीकाही गवळींनी ठाकरे गटावर केली आहे. लालूप्रसाद यादव यांनी तर हिंदुत्वाला विरोध केला होता आणि आता आदित्य ठाकरे बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना का भेटायला जात आहेत असा सवाल देखील गवळी यांनी यावेळी उपस्थित केला आहे. त्यामुळे आता शिंदे गट आणि ठाकरे गटात कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे.