सरकारन भविष्य पाहिलं मुख्यमंत्र्यांची ही कृती बेजबाबदार – अनिस


मुंबई::ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-
खरात हे अंकशास्त्राचे जाणकार मानले जातत. खरात यांच्याकडे अनेक सेलिब्रिटी येऊन गेलेत, अनेक जण त्यांच्याकडे भविष्य पाहायला येतात. याचप्रकारे खरात यांनी मुख्यमंत्र्यांना मार्गदर्शन केले, असल्याचा आरोप अनिसने केला आहे यावर अनिसने म्हंटले आहे की, भविष्य पाहण्याची, अशी कृती जर संविधानिक पदावर असलेल्या मुखमंत्र्यांकडून झाली असेल तर हे बेजबादारपणाचे आहे. यामुळे अनिसकडून मुख्यमंत्र्यांचा निषेध नोंदवला आहे. यामुळे आता या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यावर विरोधक टीका करत,आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अंधश्रद्धानिर्मूलन संघटनेने आरोप केले आहेत.
शिंदे हे ज्योतिषांच्या दरबारी गेले आहेत, असे अनिसंने म्हंटले आहे. ज्योतिषाकडे जाऊन शिंदेंनी स्वत:चं आणि सरकारटं भविष्य पाहिलं असल्याचा आरोपही अनिसंने केला आहे. मुख्यमंत्र्यांची ही कृती बेजबाबदार असल्याचेही अनिसने म्हंटले आहेमुख्यमंत्री हे काल (२३ सप्टें) रोजी नाशिक दौऱ्यावर होते. कुटुंबासहित ते तिथे शिर्डीला साईबाबांच्या चरणा ते गेले होते. या दौऱ्यानंतर अनिसने आरोप केला आहे. शिर्डीत दर्शन घेतल्यानंतर मुख्यमंत्री सिन्नरच्या दिशेने जाताना दिसले. सिन्नरजवळ ईशान्येश्वर महादेवाचं मंदिर आहे. या देवास्थानचे सर्वेसेवा अशोक थोरात यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी सल्लामसलत केली.