फॉर जेंडर इक्वॅलिटी’— ‘के बी रन २०२२’ दौड चे शनीवारी आयोजन


*’रन फॉर जेंडर इक्वॅलिटी’*———————– ‘के बी रन २०२२’ दौड चे शनीवारी आयोजन
पुणे :’रन फॉर जेंडर इक्वॅलिटी’ हा संदेश घेऊन क्नॉर ब्रेमसे टेक्नॉलॉजी सेंटर अॅण्ड कमर्शियल व्हेईकल्स् सिस्टिम्स आणि रोटरी क्लब ऑफ पुणे लोकमान्यनगर तर्फे ‘के बी रन २०२२’ दौड चे आयोजन शनीवार,दि.२६ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता करण्यात आले आहे. अॅटमबर्ग चाही या दौड मध्ये समावेश आहे.
तृतीयपंथी तसेच एलजीबीटी समुदायाला जगण्याचा सन्मान मिळावा तसेच रोजगाराविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या हेतूने ही दौड आयोजित करण्यात आली असून त्यात ७०० जण सहभागी होणार आहेत,त्यात तृतीयपंथी तसेच एलजीबीटी समुदायाचे ४० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
अंतरानुसार ३, ५,१० किलोमीटरचे गट करण्यात आले आहेत.विविध वयोगटासाठी असलेली ही दौड हिंजवडी फेज -२ मधील क्नॉर ब्रेमसे कंपनीच्या आवारातून सुरु होईल. तृतीयपंथी तसेच एलजीबीटी समुदायासाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या कादंबरी,कन्व्हर्स इंटरनॅशनल बिझनेस नेटवर्क चे अध्यक्ष कुलभूषण बिरनाले,रोटरी च्या नियोजित प्रांतपाल मंजू फडके,रोटरी क्लब ऑफ पुणे लोकमान्यनगरच्या अध्यक्ष डॉ मधुरा विप्र यांच्याहस्ते पारितोषिक वितरण होणार आहे.
सन्मानचिन्ह,पदक असे बक्षिसांचे स्वरूप आहे.नीरज गुप्ता, रोहिणी देशमुख,सिद्धेश तोरडमल,चेतन सूचक हे या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत.
*जेण्डर,डायव्हर्सिटी अँड इक्वॅलिटी …’जेण्डर,डायव्हर्सिटी अँड इक्वॅलिटी ‘हेच ब्रीदवाक्य डोळ्यासमोर ठेवून क्नॉर ब्रेमसे टेक्नॉलॉजी सेंटर अॅण्ड कमर्शियल व्हेईकल्स् सिस्टिम्स आणि रोटरी क्लब ऑफ पुणे लोकमान्यनगर हा उपक्रम आयोजित करीत आहेत.
हा रोटरी क्लब या समुदायासाठी सातत्याने काम करतो.आतापर्यंत ५ जणांना नोकऱ्या मिळवून दिल्या आहेत.क्नॉर ब्रेमसे कंपनी आणि रोटरी क्लब ऑफ पुणे लोकमान्यनगर हे या समुदायाच्या प्रशिक्षण,रोजगारासाठी पुढेही एकत्र कार्य करणार आहेत. –…