२६/११ हल्ल्यातील शहिदांना अमर जवान ज्योत प्रज्ज्वलीत करून पुष्पचक्र अर्पन


२६/११ हल्ल्यातील शहिदांना अमर जवान ज्योत प्रज्ज्वलीत करून व पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन व सैनिक युवा फोर्स सोल्जर अकॅडमीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन
पिंपरी, प्रतिनिधी : देशाची आर्थिक राजधानी मुंबईवर करण्यात आलेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या स्मृतिदिनानिमित्त शनिवारी सायंकाळी आकुर्डी रेल्वे स्टेशनजवळ पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य आणि सैनिक युवा फोर्स सोल्जर अकॅडमी यांच्या संयुक्तपणे कार्यक्रमाचे आयोजन करून २६/११ हल्ल्यातील शहिदांना अमर जवान ज्योत प्रज्ज्वलीत करून व पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी अनेकांच्या डोळ्यांत शहिदांच्या आठवणीने पाणी तराळले होते. यावेळी पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष गजाननभाऊ चिंचवडे, शुभम चिंचवडे, पुणे जिल्हाध्यक्ष सचिन लाड, पुणे जिल्हा उपाध्यक्ष कमलजित सिंह, भारतीय माजी सैनिक संघ महाराष्ट्र अध्यक्ष गोपाल वानखडे, सैनिक युवा फोर्स सोल्जर अकॅडमीचे संस्थापक रामदास मदने, भारतीय माजी सैनिक संघ पुणे जिल्हा उपाध्यक्ष यशवंत महाडिक, सैनिक युवा फोर्स सोल्जर अकॅडमीचे सहसंचालक अशोक जाधव, अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक मोहनिष बारिया, पोलिस फ्रेंड्स वेल्फेअर पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष कार्तिक गोवर्धन, पुणे शहर आयटी सेल अध्यक्ष योगेश खैरे, युवक उपाध्यक्ष प्रसाद माळगावकर, नाशिक जिल्हा युवक अध्यक्ष सागर पाटील, चिंचवड विधानसभा अध्यक्ष रणजित वडणे, सचिव राकेश सायकर, रामय्या हिरेमठ, संग्राम लाड, शिवनाथ मांडे, प्रसाद कुदळे, राज सय्यद, अमर तळेले, वैभव हेन्द्रे, मंगेश साठे, मोरेश्वर कांबळे, अनुज शहा, आदेश नाणेकर, श्रीशैल शिरगावे, सुरेंद्र मालविय आदींनी शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली.
पोलीस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशनचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष कमलजित सिंह यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
२६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकिस्तानी दहशतवाद्यांनी समुद्रमार्गे प्रवेश करत मायानगरी मुंबईला टार्गेट केले होते. या हल्ल्यामध्ये ३४ विदेशी नागरिकांसह १६६ जणांना आपला प्राण गमवावा लागला, तर सुमारे ७०० जण जखमी झाले. प्राणाची पर्वा न करता लढलेल्या पोलीस जवानांनी ९ दहशतवाद्यांना कंठस्नान घालत, अतिरेकी अजमल कसाब याला जिवंत पकडले. यात १८ पोलीस जवानांना वीरमरण आले.
यानिमित्ताने आयोजित श्रद्धांजली कार्यक्रमात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह चिमुकलेही सहभागी झाले होते. अमर जवान ज्योत प्रज्ज्वलीत करून व पुष्पचक्र अर्पण करून शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.