एक दिवस युवकच आपले व्यवसाय बंद ठेवुन महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होतील, इतकेच नव्हे तर, महाराष्ट्राची जनताही युवकांच्या या बंदला मोठा प्रतिसाद देईल…

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –

काल (२६ नोव्हेंबर) विविध मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत करत महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. त्या हाकेला रोहित पवारांनी दुजोरा दिला. राज्यातल्या युवकांचे भविष्य घडवणा-या नोकऱ्या आज राज्यातून बाहेर जात आहे. हीच खदखद आज तरुणांच्या मनात आहे. अशा परिस्थितीत एक दिवस युवकच आपले व्यवसाय बंद ठेवुन महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होतील, इतकेच नव्हे तर, महाराष्ट्राची जनताही युवकांच्या या बंदला मोठा प्रतिसाद देईल, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला महाराष्ट्राने संपुर्ण देशाला दिशा दिली. पण आज वापर इतर राज्यांच्या निवडणुकांसाठी केला जातोय की काय असा सवाल आमदार रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. राजगुरुनगर इथे त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, यावेळी ते बोलत होते. हाच प्रश्न आज आपली खरी अस्मिता आहे आणि ती टिकवण्यासाठी जे काही आपल्याला जे काही करायचं आहे ते करावचं लागेल, असंही त्यांनी सांगितलं.आज राज ठाकरे यांची गोरेगावमध्ये सभा होणार आहे, त्यांच्या सभेची मोठी तयारी करण्यात आली आहे. याबाबतही त्यांनी भाष्य केलं. “राज ठाकरेंची स्वत:ची एक वेगळी स्टाईल आहे त्यांनी ती तशीच ठेवायला पाहिजे. मात्र गेल्या काही दिवसांपासुन राज ठाकरे यांची स्टाईल कुठंतरी भाजपाची स्टाईल झाल्यासारखं राज्यातल्या जनतेला वाटतं आहे, असा चिमटाही रोहित पवारांनी राज ठाकरेंना काढला.राज ठाकरे आज सभा घेणार असतील तर त्यांनी स्वत:ची मत त्यांनी ठामपणे मांडली पाहिजेत. महाराष्ट्राच्या हिताची मतं त्यांनी मांडवी, महाराष्ट्राच्या थोर व्यक्ती आणि महाराष्ट्राच्या विचारांचा अवमान झालाय, याबद्दल त्यांनी त्यांची मत ठामपणे व्यक्त करावीत,

Latest News