वसुंधरा संवर्धन जागृतीसाठी सायकलींचा महापूर उसळला!- पिंपरी-चिंचवडमधील ‘रिव्हर सायक्लोथॉन’ला ‘रेकॉर्ड ब्रेक’ गर्दी

IMG-20221127-WA0190

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –

वसुंधरा संवर्धन जागृतीसाठी सायकलींचा महापूर उसळला!- पिंपरी-चिंचवडमधील ‘रिव्हर सायक्लोथॉन’ला ‘रेकॉर्ड ब्रेक’ गर्दी उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अभिनेता प्रवीण तरडेंसह मान्यवरांची उपस्थितीपिंपरी । प्रतिनिधी पर्यावरण संवर्धन आणि इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाची जनजागृती करण्यासाठी आयोजित केलेल्या भारतातील सर्वात मोठ्या ‘‘रिव्हर सायक्लोथॉन’’ साठी पर्यावरण प्रेमी, नागरिक आणि स्वयंसेवी संस्था- संघटनांनी तुफान प्रतिसाद दिला. सुमारे २५ हजार हून अधिक नागरिकांनी सायकल रॅलीमध्ये सहभाग घेतला. भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून आणि पिंपरी-चिंचवड महापालिका, अविरत श्रमदान, सायकल मित्र अशा विविध संस्था-संघटनांसह शाळा-महाविद्यालयांच्या पुढाकाराने ‘‘रिव्हर सायक्लोथॉन- २०२२’’ चे आयोजन करण्यात आले. अविरत श्रमदान संस्था आणि संयोजन समितीचे डॉ. निलेश लोंढे, दिगंबर जोशी, शिवराज लांडगे, डॉ. आनंद पिसे, बापू शिंदे, सुनील बेळगावकर, डॉ. अश्विनी वानखेडे, रविकिरण केसरकर, सीमा शादबार, तृतीय पंथी प्रतिनिधी गायत्री थेरगावकर यांच्यासह विविध संस्था-संघटनांच्या प्रतिनिधी रॅली यशस्वी करण्यात पुढाकार घेतला

Latest News