‘काश्मीर फाईल्स-२’ हा चित्रपट काढावा आणि वर्षभरात काश्मीरमध्ये काय झालं, ते सांगावं: खा संजय राउत

मुंबईः ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-

संजय राऊत म्हणाले की, काश्मीर फाईल्स हा चित्रपट वल्गर असल्याचं म्हटलं आहे, मुळात हा चित्रपट एका पक्षाचाच प्रचार दिसतोय. ‘काश्मीर फाईल्स’ काढणाऱ्यांनी ‘काश्मीर फाईल्स-२’ हा चित्रपट काढावा आणि वर्षभरात काश्मीरमध्ये काय झालं, ते सांगावं. कारण या वर्षात काश्मिरी पंडितांवर आणि सुरक्षा यंत्रणांवर हल्ले वाढलेले आहेत. या चित्रपटामुळे अत्याचार वाढल्याचं राऊत म्हणाले.

सीमावादाच्या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले की, कर्नाटकी लोकं इथं येतात आणि त्यांचा झेंडा फडकवतात, हे साधंसुधं नाही. महाराष्ट्र सरकारचा याला पाठिंबा असल्याशिवाय हे घडणार नाही. त्यामुळे सरकारने पुढे येऊन आपली भूमिका मांडली पाहिजे, असं राऊत म्हणाले.काश्मीर फाईल्स आणि सीमावाद प्रश्नावरुन सध्या राजकीय वातावरण तापलेलं आहे. यातच आज संजय राऊत यांनी काश्मीर फाईल्सबद्दल अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलाय. शिवाय राज्य सरकराच्या दुबळेपणाचा पाढाच त्यांनी वाचला