धडाकेबाज ”मुंढे” यांची शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती…


मुंबई (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-)
राज्यात शिंदे- सरकार आल्यानंतर कुटुंब कल्याण तथा संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबईच्या आयुक्तपदाची जबाबदारी तुकाराम मुंढे यांच्याकडे देण्यात आली होती. मात्र आज तुकाराम मुंढे यांच्यासह आणखी काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.महाराष्ट्रातील धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी अशी ओळख असलेले तुकाराम मुंढे यांची शिर्डीच्या साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे
गेल्या १६ वर्षांच्या सेवेत तुकाराम मुंढे यांची २० पेक्षा जास्त वेळा बदली झाली आहे. तुकाराम मुंढे हे २००५ सालच्या आयएसएस बॅचचे अधिकारी आहेत. तुकाराम मुंढे यांची धडाकेबाज प्रशासकीय अधिकारी अशी ओळख आहे. आता त्यांची राष्ट्रीय आरोग्य अभियान, आयुक्तपदाच्या जबाबदारीवरून साईबाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.