राज्यपाल या वयात शिवनेरीवर पायी गेले, शिवरायांबद्दल अनादर कसा असेल?-राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील


पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना ) – , “जे राज्यपाल या वयात शिवनेरीवर पायी गेले त्याच्या मनात शिवरायांबद्दल कसा अनादर असेल. का? तुम्ही समाजामध्ये तेढ निर्मण करताय.मी त्यांच्या बोलण्याचे समर्थन करत नाही. मात्र, या लेवलच्या माणसाने स्क्रिप्ट करून बोललं पाहिजे. बोलल्यावर मला असं म्हणायचं नव्हतं, असं म्हणून चालत नाही,अशा शब्दात त्यांनी राज्यपालांनाही सल्ला दिला आहे
पुणे : शिवरायांचा अपमान कोणी केलेला आणि करूही शकत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण येथे उभे आहोत. महाराजांचा अपमान राज्यपालांनी केलाय, असा आरोप तुम्ही करताय, परंतु ते शिवनेरी गडावर पायी गेले. संजय राऊत (Sanjay Raut) गेले नाहीत ते हॅलीकोप्टरने गेले होते. हिम्मत असेल तर शिवनेरीच्या पायऱ्या चढून दाखवा,असे थेट आव्हान भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले
पुढे ते म्हणाले, ज्या माणसाच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल इतका आदर आहे. त्या व्यक्तीच्या एका वाक्याने इतके दिवस गदारोळ होत आहे. उदयनराजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत.आमचेही आदरणीय आहेत