देवेंद्रजीं राज्याचे गृहमंत्री आहेत एका पक्षाचे नाहीत…

पुणे – ऑनलाईन परिवर्तनाचा सामना –
देवेंद्रजींना विसर पडला असेल तर मी सांगू इच्छिते की, ते राज्याचे गृहमंत्री आहेत एका पक्षाचे नाहीत. त्यामुळे महाराष्ट्राच्या भावना समजून घ्या. किमान सभागृहात निंदाजनक ठराव घ्या. तसेच देवेंद्रजींनी लोकभावना समजून घ्यावी. मात्र ते भाजपच्या नेत्यांना पाठिशी घालत असतील तर देवेंद्रजी आपल्याला आणि भाजपला हे वाचाळवीर बुडवल्याशिवाय राहणार नाही, असाही इशाराही अंधारे यांनी दिला.दरम्यान आतापर्यंत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांपैकी कोणीही माफी मागितली नाही. सर्व नेत्यांमध्ये मस्तवालपणा आला आहे. काहीही केलं तरी भाजप आम्हाला वाचवणार आहे. एकूणच तुम्ही भाजपच्या सोबत असला तर तुम्ही महिलांविषयी किंवा महापुरुषांविषयी वादग्रस्त वक्तव्य करू शकता, असा समज नेत्यांनाचा झाल्याचंही अंधारे यांनी म्हटलं.सुषमा अंधारे म्हणाल्या की, पंतप्रधान मोदींजींना रावण म्हटल्यानंतर अत्यंत तत्परतेने देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. मात्र महापुरुषांचा सातत्याने अवमान होत असताना ते सोयीस्कर मौन बाळगून आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, प्रसाद लाड, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा यांच्या विधानांवर ते गप्प आहे. भाजपकडून आणि टीम देवेंद्र यांच्याकडून महापुरुषांचा अवमान करण्याचा सुनियोजित कट रचला जात असल्याचं त्यांनी नमूद केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान आणि महापुरुषांबद्दल सातत्याने होत असलेल्या वादग्रस्त विधानांचा निषेध कऱण्यासाठी आज पुणे बंदची हाक देण्यात आली. पुण्यातील बंदला महाविकास आघाडीने पाठिंबा दिला असून राज्यपाल हटावची घोषणा देण्यात आली. यावेळी शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री आणि भाजपनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर कडाडून टीका केली