बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष केशव क्षीरसागरला अटक…

keshav

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – काल रिक्षा आंदोलनावेळी चक्काजाम केलं होतं. त्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. काल संध्याकाळी रिक्षाचालकांनी पुण्यातल्या आरटीओ चौकामध्ये रिक्षा लावल्या होत्या.

रात्री उशिरापर्यंत रिक्षा तिथेच लावलेल्या होत्या रिक्षाचालकांचं पुण्यात कालपासून आंदोलन सुरू आहे. यावेळी चक्काजाम करण्यात आला होता. याप्रकरणी बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांना अटक करण्यात आली आहे.अखेर पोलिसांनी स्वतः रात्री उशिरा येऊन त्या बाजूला केल्या. याबद्दल ३० ते ४० रिक्षा चालकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. शिवाय आता आंदोलनस्थळी दंगल नियंत्रण पथकही तैनात करण्यात आलं आहे.

Latest News