उदयनराजे वेळ प्रसंगी भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देतील: सुषमा अंधारे

udaynraje

पुणे – ( ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) –महापुरुषांच्या बदनामेच सुनियोजित षडयंत्र देवेंद्रजींच्या नेतृवात सुरू आहे उदयनराजे यांच्या मूक मोर्चातील सहभागावर म्हटलं की, उदयनराजे वेळ प्रसंगी भाजपच्या खासदारकीचा राजीनामा ही देतील. तसेच उद्योग गुजरातला, मंत्री गुवाहाटीला, गावं कर्नाटकात आणि आपण आज लाल महालात, असंही अंधारे यांनी नमूद केलं.

सुषमा अंधारे म्हणाल्या की, राज्यपाल पद याबद्दल आम्हाला नितांत आदर आहे पण त्यावर बसलेली व्यक्ती आदराच्या लायकीची नाही. जेव्हा जेव्हा ते महापुरुषांबद्दल बोलले तेव्हा ना मुख्यमंत्र्यांनी की उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना रोखलं. ना ४० चुकार भावांनी देखील त्यांना थांबवले नाही

एकनाथभाऊ बाजूला बसले असून महाराष्ट्राचे स्टेरिंग देवेंद्रजींच्या हातात आहे, असा दावाही त्यांनी केला.मागील काही दिवसांपासून वादग्रस्त विधाने करून छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्याने अवमान होतं आहे. अवमान करणाऱ्यांमध्ये भाजपशी निगडीत लोक आणि नेते अधिक आहेत. याचा निषेध करण्यासाठी आज पुणे बंदचे आवाहन करण्यात आले होते.

या मोर्चात भाजप खासदार छत्रपती उदयनराजे देखील सामील झाले होते. यावेळी यावेळी उपस्थितांना संबोधित करताना सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला.

Latest News