रिक्षा चालकांना संकटात टाकून बोगस रिक्षा चालकांनी पळ काढला : बाबा कांबळे


रिक्षा चालकांना संकटात टाकून बोगस रिक्षा चालकांनी पळ काढला : बाबा कांबळे
हे रिक्षा संघटनांच्या एकूणच आंदोलनात कधीही घडले न्हवते. रिक्षा चालकांचे न भरून येणारे दुःख आहे. या मधून रिक्षा चालकांना बाहेर यायला बराच कालावधी लागणार आहे. त्या रिक्षा चालकांच्या पाठीशी ठाम उभा राहण्याऐवजी बोगस प्रतिनिधींनी देखील पळ काढल्याची घटना घडली आहे.
ही वृत्ती लढाऊ रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींना शोभणारी नाही. त्यामुळे रिक्षा चालकांनी अशा फसव्या नेतृत्वाला बळी न पडण्याचे आवाहन महाराष्ट्र रिक्षा पंचायत, महाराष्ट्र राज्य रिक्षा चालक मालक संयुक्त कृती समिती, ऑटो रिक्षा, टॅक्सी, ट्रान्सपोर्ट फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले.
तसेच चुकीच्या नेतुत्वामुळे ज्या रिक्षा चालकांवर गुन्हे दाखल झाले आहेत, त्यांच्यासाठी देखील लढा उभारून त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यासाठी पाठपुरावा करू, असेही बाबा कांबळे म्हणाले.
बाबा कांबळे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे की, सामाजिक चळवळीतील जेष्ठ नेते डॉ. बाबा आढाव स्वर्गीय शरद राव यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनात सहभाग घेतला. सहा आसनी रिक्षा बंद होण्यासाठी पुण्यात मोठे आंदोलन उभे राहिले होते.
जेल भरो आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी जेलमध्ये जागा नसेल एव्हढे प्रतिनिधी आंदोलन करत होते. रिक्षा संघटनांचे ते ऐतिहासिक आंदोलनाची घटना होती. अशी अनेक आंदोलने करण्यात आली. मात्र रिक्षा चालकांना कधीही अडचणीत आणले नाही. 12 डिसेंबर रोजी संप न करण्याचे आवाहन पुणे जिल्हा प्रशासनाने रिक्षा संघटनांना केले होते. रिक्षा चालकांच्या मागण्यांबाबत कार्यवाही करण्यासाठी काही दिवस थांबा असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते.
मात्र काही बोगस रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींनी रिक्षा चालकांची दिशाभूल करत आंदोलनाचा मार्ग निवडला. संप करायचेच सांगून रिक्षा चालकांना रस्त्यावर उतरविण्यास भाग पडले. या आंदोलनात महाराष्ट्र रिक्षा पंचायत, पुणे रिक्षा फेडरेशन, सावकाश रिक्षा संघटना, जय महाराष्ट्र रिक्षा संघटना आदी नी सहभाग घेतला नव्हता.
रिक्षा चालकांनी देखील काही चुकीच्या लोकांनी पुकारलेल्या बंद मध्ये सहभागी होऊ नये, असे वारंवार आवाहन केले होते. मात्र बोगस रिक्षा संघटनांच्या प्रतिनिधींचे ऐकून रिक्षा चालकांनी संपात सहभाग घेतला. आंदोलन भरकटले. हिंसक आंदोलन करायला भाग पाडले
या गोष्टीचा रिक्षा चालकांनी विचार करून चुकीच्या लोकांना साथ न देण्याचे आवाहन बाबा कांबळे यांनी केले. महाराष्ट्र रिक्षा पंचायतने कायदा व सुव्यस्था बिघडेल, नागरिकांची गैरसोय होईल असे आंदोलन केले नाही. कायदेशीर मार्गाने रिक्षा संघटनांच्या मागण्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले.
बेकायदेशीर रॅपीडो कंपनीवर गुन्हा दाखल झाला हे श्रेय खऱ्या अर्थाने महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे आहे. संघटनेने वारंवार आंदोलन छेडल्याने आरटीओ प्रशासनाने ही कारवाई केली. एवढ्यावरच शांत न बसता ओला उबेर कंपनीवर देखील गुन्हे दाखल झाले पाहिजेत,
यासाठी महाराष्ट्र रिक्षा पंचायत पाठपुरावा करत आहे. या बरोबरच कल्याणकारी महामंडळ स्थापन करून रिक्षा चालक मालकांसाठी चांगली धोरणे आखावीत, अनुदानाबाबत आर्थिक मदत होईल, यासाठी प्रयन्त केले जाणार आहे. यासह अनेक मागणीसाठी लढा करणार आहे.
आता रिक्षा चालकांनी देखील खऱ्या लोकप्रतिनिधींना साथ द्यायला हवी. महाराष्ट्र रिक्षा पंचायत, महाराष्ट्र राज्य रिक्षा चालक मालक संयुक्त कृती समिती,च्या पाठीशी रिक्षा चालकांनी उभे राहावे. त्यांना न्याय दिल्याशिवाय राहणार नसल्याचे बाबा कांबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले.