गोल्डन जंपस्टार्ट मेंटरशिप प्रॉग्राम ‘आर्किटेक्ट ने कप्तानाची भूमिका पार पाडावी : हृषीकेश कुलकर्णी-आर्किटेक्चर विद्यार्थ्यांसाठी व्ही.के. ग्रुपचा पुढाकार

IMG-20221213-WA0181

*’गोल्डन जंपस्टार्ट मेंटरशिप प्रॉग्राम ‘* ——————-*आर्किटेक्ट ने कप्तानाची भूमिका पार पाडावी : हृषीकेश कुलकर्णी*———-आर्किटेक्चर विद्यार्थ्यांसाठी व्ही.के. ग्रुपचा पुढाकार

पुणे :आर्किटेक्चर क्षेत्रातील करियरशी निगडित मुद्द्यांवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी,चर्चा करण्यासाठी ‘गोल्डन जंप स्टार्ट ‘ या उपक्रमात दुसऱ्या दिवशी दि.१३ डिसेंबर रोजी सायंकाळी ‘ डिझाईन मॅनेजमेंट आणि फायनान्शियल मॅनेजमेंट ‘ या विषयावर आर्किटेक्ट तसेच ‘ व्ही.के. आर्किटेक्चर ‘ चे पार्टनर ह्रषीकेश कुलकर्णी यांचे मार्गदर्शन आयोजित केले होते

.’ प्रत्येक प्रकल्पाची उभारणी करताना आर्किटेक्ट ने टीमच्या कप्तानाची भूमिका बजावावी. सर्व संबंधित घटकांच्या सूचना विचारात घ्याव्यात, मात्र प्रकल्प पूर्ण करण्यावरच लक्ष केंद्रीत करावे, हेच आर्किटेक्ट चे काम आणि कर्तव्य आहे, ‘

असे हृषीकेश कुलकर्णी यांनी सांगितले. ‘सर्व मान्यता असल्याशिवाय प्रकल्पाच्या कामास सुरवात करू नये. डिझाईनमध्ये सतत बदल करू नये.संबंधित सर्व कायद्यांचा, खर्चाचा अभ्यास असावा. प्रकल्प उशीरा पूर्ण होणे, खर्च वाढणे, कोणाच्याच हिताचे नसते, ‘ असेही त्यांनी सांगितले.

आर्किटेक्टच्या करियर साठी उपयुक्त पुस्तकांची माहितीही त्यांनी दिली.पहिल्या दिवशीच्या सत्रात १२ डिसेंबर रोजी व्ही.के. ग्रुपच्या ऑपरेशन्स विभागाच्या संचालिका अपूर्वा कुलकर्णी यांनी ‘ आर्किटेक्चर क्षेत्रातील कारकिर्दीची उभारणी ‘ या विषयावर मार्गदर्शन केले.

हा कार्यक्रम व्ही.के. ग्रुपच्या सेनापती बापट रस्त्यावरील मुख्यालयात झाला.या मेंटरशिप प्रोग्रामसाठी ३० विद्यार्थी निवडण्यात आले आहेत.शिवाली वायचळ, अमोल उंबरजे यांनी संयोजन केले. १३ डिसेंबर रोजी ‘ १४ डिसेंबर रोजी द्वैपायन चक्रवर्ती ‘ प्रकल्प व्यवस्थापन ‘ विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

१५ डिसेंबर रोजी ‘ प्लॅन सँक्शनिंग ‘ विषयावर ह्रषीकेश कुलकर्णी ,१६ डिसेंबर रोजी पर्यावरणविषयक मुद्यांवर अनघा परांजपे -पुरोहित, डॉ.पूर्वा केसकर मार्गदर्शन करणार आहेत.१७ डिसेंबर रोजी ज्येष्ठ आर्किटेक्ट विश्वास कुलकर्णी , तसेच वरिष्ठ आर्किटेक्ट मंडळींशी संवाद साधण्याची संधी या विद्यार्थ्यांना मिळणार आहे. ज्येष्ठ आर्किटेक्ट विश्वास कुलकर्णी यांनी स्थापन केलेल्या व्ही. के. ग्रुप या प्रसिद्ध आर्किटेक्चर कंपनीच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त हे उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत

Latest News