भारती विद्यापीठ मध्ये ‘इंडो- साऊथ कोरिअन मीट ‘ उत्साहात-भारती विद्यापीठाला दक्षिण कोरियाच्या शिष्टमंडळाची सदिच्छा भेट


प्भारती विद्यापीठ मध्ये ‘इंडो- साऊथ कोरिअन मीट ‘ उत्साहात-
—–भारती विद्यापीठाला दक्षिण कोरियाच्या शिष्टमंडळाची सदिच्छा भेट*
पुणे : भारती विद्यापीठ येथे ‘इंडो- साऊथ कोरिअन मीट ‘ उत्साहात पार पडली. दक्षिण कोरियातील उलसान शहर आणि पुणे शहरादरम्यान परस्पर शैक्षणिक तसेच तंत्रज्ञान विषयक सहकार्य वाढविण्याविषयी , शैक्षणिक आदान प्रदान विषयक, भारत- कोरिआ असोसिएशन स्थापनेविषयी, आयात- निर्यात प्रदर्शन आयोजना विषयी चर्चा झाली.
कोरियन शिष्टमंडळाने भारती विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र,अभियांत्रिकी,आयुर्वेद विभागांमध्ये सहकार्यामध्ये रस दाखविला.भारती विद्यापीठाचे सचिव डॉ.विश्वजित कदम,कुलगुरू डॉ.विवेक सावजी,रजिस्ट्रार जी.जयकुमार,विभागीय व्यवस्थापक संजीव पाटील,भारती विद्यापीठाच्या व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता आणि आयएमईडीचे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर, डॉ.महाजन,दीपक नवलगुंद, डॉ. भारती जाधव उपस्थित होते
.के.के. उन( वार्टसिला कॉर्पोरेशन) ,जे.बी. सांग,जंगयांग आय.एम., जे.वाय. चॉय, प्रदीप तुपे(पुणे मॅनेजमेंट असोसिएशन), प्रशांत सौंद( (पुणे मॅनेजमेंट असोसिएशन ), प्रशांत जोगळेकर( मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, पुणे), संजय गांधी, राहुल जोशी, सुनेहा पाटील यांनी चर्चेत सहभाग घेतला