माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे तब्बल चौदा महिन्यानंतर जेलबाहेर…

मुंबई ( ऑनलाईन परिवर्तनाचा सामना )- अनिल देशमुख हे तब्बल १३ महिन्यानंतर जेलबाहेर आले. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, दिलीप वळसे पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या
दरम्यान, अनिल देशमुख यांच्या सुटकेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या, ”देशमुख कुटुंबावर तब्बल १०९ वेळा रेड टाकून ईडी सरकारने वर्ल्ड रेकॉर्ड केलं आहे”, असा हल्लाबोल त्यांनी केंद्र सरकारवर केला
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी गृहमंत्री यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तब्बल १३ महिन्यानंतर अनिल देशमुख हे तुरुंगातून बाहेर आले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.सुप्रिया सुळे माध्यमांशी संवाद साधताना म्हणाल्या ”अनिल देशमुख यांच्यावर या ईडी सरकारकडून खोटे आरोप करण्यात आले.
कोर्टाच्या आर्डरमध्ये कुठलाही पुरावा त्यांच्याविरोधात सापडलेला नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने तर वर्ड रेकॉर्ड केलंय. अनिल देशमुख आणि त्यांच्या कुंटुबांवर तब्बल १०९ वेळा रेड टाकण्यात आली. एवढ्या वेळा रेड करावी लागली याचा अर्थ त्यांना काहीही सापडले नाही.
याबाबतची नोंद देखील कोर्टाच्या आर्डरमध्ये आहे”, असं त्या म्हणाल्याअनिल देशमुख यांच्या स्वागताची राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली. आर्थर रोड जेलबाहेर मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांच्या सुटकेमुळे कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा केला.