सर्वांनी एकत्रित काम केल्यास यश नक्कीच मिळेल – प्रदीप जांभळे


खडकी : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-) समाजामध्ये काम करताना सर्वांनी एकत्र मिळून करतांना सर्वांना सहकार्य करणे गरजेचे आहे. सर्वांनी एकत्रितपणे कामे केल्यास आपल्याला यश मिळेलच तसेच आपली प्रतिमा देखील उंचावेल असे गोरोद्गार राष्ट्रपती पदक पटकाविले सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप बापू जांभळे यांनी काढले.
महाराष्ट्र ख्रिस्ती संघाच्या वतीने ख्रिसमस महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्टवादी काँग्रेसचे सरचिटणीस वसुंधरा नीरभवणे, रिपब्लिकन पार्टीचे परशुराम वाडेकर, गिदाई सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद रणपिसे उपस्थित होते.
कार्यक्रमांमध्ये ख्रिसमस महोत्सवानिमित्त मान्यवरांच्या हस्ते ख्रिस्त जन्मोत्सव केक कापण्यात आला. या प्रसंगी सेंट मेरी चर्चचे रेव्ह. सुनील राऊत यांनी उपस्थितांना सर्व धर्मभाव, मानव, क्षमा, याचना आणि सर्व मानव जातीचे कल्याण होण्याकरिता शुभ संदेश देऊन शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमात दहशतवादी विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप उर्फ बापू जांभळे यांना राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आले. कार्यक्रमात माजी नगरसेविका शैलेजा खेडेकर, माजी नगरसेवक श्रीकांत पाटील, सुखाई प्रतिष्ठान अध्यक्ष अविनाश कांबळे, ए. आय. अंथोनी, अग्नेश कांबळे, काँग्रेस नेते इंद्रजित भालेराव, ब्लॉक अध्यक्ष राजेंद्र भुतडा, दिलशाद अत्तार, रिपब्लिकन स्वाभिमानी अध्यक्ष जीवन घोंगडे, अनिल भिसे, बोपोडी सोशल ग्रुप अध्यक्ष महंमद शेख, निलेश रुपटक्के इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन ख्रिस्ती संघाचे अध्यक्ष सुरेश ससाणे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऍड. रमेश पवळे तर आभार प्रदर्शन ऍड. विठ्ठल आरुडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रवीण मरपळे, निलेश वाघमारे, मंगेश रूपटक्के, अतिश केंगार, अनिल रास्ते, राजेंद्र शिंदे यांनी केले.