न्यायाव्यवस्थेचा उपयोग राजकीय हत्यार म्हणून होताना दिसते .. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

पुणे (-ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)- मराठा समाजाच्या मुलांना आरक्षण मिळणे आवश्यक आहे. मात्र केवळ आरक्षणाची आस लावून न बसता, इतर अनेक मार्गांनी प्रयत्न करावेत. सर्वप्रथम आरक्षणाचा निर्णय मीच घेतला होता. त्यामुळे प्रत्येकाला आरक्षण मिळावं ‘ न्यायाव्यवस्थेचा उपयोग राजकीय राजकीय हत्यार म्हणून होताना दिसून येत आहे. असे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे

महाराष्ट्रात आतापर्यंत २९०० छापे टाकण्यात आले महाराष्ट्राला ‘रेड (छापा ) राज्य’ म्हंटलं जावं का ? अशी स्थिती आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख गेले वर्षभरापासून आतमध्ये आहेत. आता कायद्यांचा राजकीय हेतू बाबत काय बोलावं.? असे चव्हाण म्हणाले.

संभाजी ब्रिगेड या संघटनेचे अधिवेशन पुणे शहरात पार पडले. गणेश कला क्रिडा मंच इथे हे अधिवेशन होत आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते पार पडले. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते अधिवेशनाचा समारोप करण्यात येणार आहे

उद्घाटन समारंभावेळी खासदार श्रीनिवास पाटील, इंदूरचे श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर, युवराज संभाजीराजे भोसले हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते भरत जाधव यांना जीवनगौरव पुरस्कार, तसेच अभिनेते अशोक समर्थ व लेखक अरविंद जगताप यांनाहीविशेष पुरस्काराने गौरविण्यात आले आहे

Latest News