खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करा:रुपाली पाटील यांचे मुख्यमंत्री शिंदे ना निवेदन.

पुणे :(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- ) राहुल शेवाळे यांच्यावर एका तरुणीने बलात्कार आणि अत्याचाराचा आरोप केला होता. हा विषय राज्याच्या हिवाळी अधिवेशनात चांगलाच पेटला होता. या तरुणीचे दाऊदशी संबंध असल्याचं राहुल शेवाळेंनी सांगितलं होतंरुपाली पाटील ठोंबरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी नागपुरामध्ये गेल्या होत्या. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना निवेदनही दिलं. खासदार राहुल शेवाळे यांच्याविरोधात एफआयआर दाखल करा, अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. यावेळी शेवाळे यांच्याविरोधातले पुरावेही रुपाली पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केले

. त्यानंतर आज पुन्हा या तरुणीने राहुल शेवाळेंचं पाकिस्तान, कराची कनेक्शन असल्याचे आरोप केले राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज नागपुरात भेट घेतली. पुण्यात कसबा पेठेतून निवडणूक लढवण्यास आपण इच्छुक असल्याचं विधान केल्याने त्या चर्चेत आल्या होत्या.

Latest News