MSEB: राज्यातील जनतेने कुठेही भयभीत होण्याची आवश्यकता नाही- महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे संचालक विश्वास पाठक 

पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) -पाठक म्हणाले, राज्यातील जनतेने कुठेही भयभीत होण्याची आवश्यकता नाही. वीज कर्मचारी त्यांच्या संपाविषयीची भूमिका बदलतील याची खात्री आहे. अन्यथा पर्यायी व्यवस्था झाली असल्याने विद्युत पुरवठा अखंडित सुरु राहील याची खात्री बाळगावी महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे संचालक विश्वास पाठक यांनी टि्वट करत वीज कर्मचार्यांच्या संपाविषयी महत्वाची माहिती दिली आहे.

महावितरणच्या महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या वीज कंपन्यांतील कर्मचाऱी मध्यरात्री 12 वाजण्यापासून तीन दिवसांच्या संप पुकारला आहे. यामुळे पुढील तीन दिवसांत राज्यातील वीजपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र, आता महावितरणकडून या संपाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. राज्यातील जनतेला आश्वासित केलं आहे

.याचदरम्यान राज्य सरकारने नोटिशीद्वारे संपावर गेलेल्या वीज कर्मचार्यांना इशारा दिला आहे.तसेच राज्य सरकारने संपावर जाण्याआधीच महावितरण च्या वीज कर्मचार्यांना एक नोटीस पाठवली आहे. त्यात महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परीरक्षा अधिनियम २०१७ अन्वये वीज पुरवठ्याशी संबंधित कोणतीही सेवा ही अत्यावश्यक सेवेमध्ये येत असल्याने त्या आवश्यक सेवेच्या परीरक्षा अधिनियमा अंतर्गत या सेवेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सार्वजनिक हितास्तव संपावर जाण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे

.महावितरणशी निगडित तीन कंपन्यांच्या कर्मचार्यांनी संपाची हाक दिली आहे. यामुळे राज्यातील वीज पुरवठ्यावर मोठा परिणाम होणार आहे. आताच राज्यातील विविध भागात बत्तीगुल झाली आहे. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संपातील वीज कर्मचार्यांची बैठक होणार आहे

. या बैठकीत संपावर तोडगा निघणार की संप पुढे कायम राहणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेलं आहे. यावेळी फडणवीसांनी अतिरिक्त वीज पुरवठा तयार ठेवण्याचे आदेश ऊर्जा विभागाला दिले आहेतया कायद्यांतर्गत शासनाने नोटिफिकेशन काढले असून त्या अधिनियमा अंतर्गत संपावर जाण्यासाठी प्रतिबंध करण्यात आला आहे.

त्यामुळे वीज कर्मचाऱ्यांना संपावर जाता येणार नाही. आणि त्यांनी संप पुकारला तर त्यांच्यावर मेस्मा अंतर्गत कारवाई केली जाईल असा इशारा देखील दिला आहे.महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण या वीज कंपन्यांतील कर्मचार्यांनी संप पुकारला आहे. अदानी समूहाला वीज वितरणचा परवाना देण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप कर्मचार्यांकडून करण्यात आला आहे. मात्र, या संपामुळे राज्यातील वीजपुरवठ्यावर देखील परिणाम होण्याची शक्यता आहे

.भांडुप कार्यक्षेत्रातील काही भागांत वीज वितरण परवाना मिळविण्यासाठी अदानी वीज कंपनीनं राज्य वीज नियामक आयोगाकडे अर्ज केला आहे. आणि राज्य सरकार अदानी कंपनीला वीज वितरण परवाना देण्याविषयी राज्य सरकार सकारात्मक आहे. आणि अदानी कंपनीला वीज परवाना देण्याबाबत जोरदार हालचाली देखील सुरु असल्याचा आरोप देखील संपातील कर्मचार्यांनी केला आहे.

Latest News