भारतीय विद्या भवनमध्ये ७ जानेवारी रोजी कुचीपुडी नृत्य सादरीकरण— भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम


भारतीय विद्या भवनमध्ये ७ जानेवारी रोजी कुचीपुडी नृत्य सादरीकरण* ——————————– भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम
पुणे ःभारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत कुचीपुडी या एकल नृत्य कार्यक्रमाचे आयोजन शनीवार, ७ जानेवारी २०२३ रोजी सायंकाळी सहा वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे करण्यात आले आहे.
परिमल परफॉर्मिंग आर्टस् अँड रिसर्च सेंटर च्या प्रस्तुत या कार्यक्रमात कासी आयसोला (अमेरिका) यांचे एकल नृत्य सादर होणार आहे.हा कार्यक्रम विनामूल्य आहे.‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा १४९ वा कार्यक्रम आहे. भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी ही माहिती दिली..