रोटरी युथ लीडरशिप अवॉर्ड्स’कार्यक्रम ५ जानेवारी रोजी

IMG-20230104-WA0224

रोटरी युथ लीडरशिप अवॉर्ड्स’कार्यक्रम ५ जानेवारी रोजी

* पुणे :’रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ स्पोर्ट्स सिटी इन्स्पायरा’ च्या वतीने ‘रोटरी युथ लीडरशिप अवॉर्ड्स’ हा कार्यक्रम ५ जानेवारी रोजी गुरु नानक हायस्कुल(कॅम्प) येथे ५ जानेवारी रोजी सकाळी साडे आठ ते दुपारी १२ या वेळेत आयोजित करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांना दैनंदिन आयुष्यात उपयोगी पडणारी कौशल्ये,वेळेचे व्यवस्थापन,एटीकेट्स,शिक्षणाचे महत्व आदी गोष्टींचे प्रशिक्षण या कार्यक्रमात देण्यात येणार आहे.

४०० विद्यार्थी सहभागी होणार आहेत. रोटरीचे नियोजित प्रांतपाल शीतल शहा यांच्या हस्ते या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन होईल,मुकेश गुप्ता,रमेश बेंद्रे,रोहिणी बन्सल,केनेडी सॅम्युएल हे रोटरीचे पदाधिकारी पाहुणे म्हणून उपस्थित असतील

.रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ स्पोर्ट्स सिटी इन्स्पायरा चे अध्यक्ष डॉ भरत पाटील,सचिव जितेंद्र सिंग,खजिनदार अमित नागपाल यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. हा क्लब रोटरी क्लब ऑफ पुणे स्पोर्ट्स सिटी शी संलग्न असून दोन वर्ष कार्यरत आहे

Latest News