बाळासाहेबांची शिवसेना व पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या युतीची अधिकृत घोषणा….

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, बाळासाहेबांची शिवसेनेसोबत जोगेंद्र कवाडे यांच्या रिपब्लिकन पिपल्स पार्टीने युती करण्याचं निर्णय घेतला त्याबद्दल धन्यवाद देतो

. कवाडेंसोबत आधीपासूनच चांगले संबंध होते. दोन्ही पक्ष संघर्षातून पुढे आलेले आहेत. आमचा संघर्ष साधा नव्हता. कवाडे यांनी देखील वंचित, दुर्बल आणि शोषित घटकांतील लोकांच्या हक्कासाठी, न्यायासाठी संघर्ष केला आहे.याच त्यांच्या भूमिकेमुळेच अनेकदा त्यांना तुरुंगवास देखील डांबण्यात आलं. दोन्ही पक्ष सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम करणार आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) व जोगेंद्र कवाडे यांनी मुंबई येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले.

या पत्रकार परिषदेत बाळासाहेबांची शिवसेना व पिपल्स रिपब्लिकन पार्टीच्या युतीची अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी दोन्ही पक्षातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बाळासाहेबांची शिवसेना व जोगेंद्र कवाडे यांच्या पिपल्स रिपब्लिकन पार्टी या दोन्ही पक्षांच्या युतीवर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे

. यामुळे उध्दव ठाकरें अगोदर मुख्यमंत्री शिंदेंनी कवाडे यांच्याशी युतीची घोषणा करुन एकप्रकारे ठाकरे गटाला शह देण्याचा प्रयत्न केला आहे.यावेळी जोगेंद्र कवाडे म्हणाले, मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे हे धाडसी मुख्यमंत्री आहेत. तसेच ते तळागळातून व संघर्ष करत पुढे आलेलं नेतृत्व आहेत. राज्यात अनेक ठिकाणी फिरलो. त्यावेळी राज्यातील लोकांमध्ये काही महिन्यांपूर्वी सत्तेत आलेलं शिंदे फडणवीस सरकार सर्व सामान्यांचं सरकार असल्याची भावना पाहायला मिळाली.त्यामुळे जर आघाडी करायचीच असेल तर बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेशीच करायची असं मत आमच्या पक्षाकडून व्यक्त करण्यात आलं.

महाराष्ट्राच्या विकासाच्या राजकारणाला गतिमान करताना सर्वांच्या हक्क, प्रगती, विकासासाठी शिंदेंचा पक्ष कटीबध्द आहे. त्यामुळे दोन्ही पक्ष निवडणुकीत एकत्रितपणे लढणार आहे.यावेळी कवाडे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सांस्कृतिक भवनवर बुलडोझर चालविण्यात आला. याविषयी तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना अनेकदा निवेदन दिले. पण त्यांची दखल घेतली गेली नाही. पण काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेल्या शिंदेंना याबाबत निवेदन दिलं. त्यावेळी त्यांनी याप्रकऱणी कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. त्यामुळे शिंदे हे फक्त आश्वासन देणारे नाही प्रत्यक्ष कृती करणारे नेते आहेत

Latest News