पोलिस दलात मोडतोड करूण ग्रहमंत्री समांतर प्रशासन चालवण्याचा प्रयत्नात- अतुल लोंढे

मुंबई (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) – विशेष पोलिस आयुक्तपद मुंबई पोलिस आयुक्तांच्या अधिपत्याखाली राहील, असे सरकारने स्पष्ट केले असले तरी देवेन भारती यांच्याकडे सहपोलिस आयुक्त यांच्या कामावर पर्यवेक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.त्यांची विशेष आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. ही निवड करणे गरजेचे आहे का,पोलीस दलात अशी मोडतोड करण चुकीचं आहे ग्रहमंत्री समतर सरकार चालवण्याचा प्रयत्न करतात,असा प्रश्न आता काँग्रेसने विचारला आहे. उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर काँग्रेसने निशाणा साधला आहे.

त्यामुळे मुंबई पोलिस दलात हे पद प्रभावी ठरणार असल्याचे सरकारचे मत आहे.देवेन भारती हे याआधी मुंबईचे सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था), पोलिस सहआयुक्त, आर्थिक आणि गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून काम केले आहे. याशिवाय त्यांनी महाराष्ट्र एटीएसचेही नेतृत्व केले आहे राज्याच्या गृहविभागाने बुधवारी 1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी देवेन भारती यांच्याकडे नवीन जबाबदारी सोपवली आहे

विशेष पोलीस आयुक्तपद काय आहे. ?

  • आतापर्यंत महासंचालक पदाच्या अधिकाऱ्यांची पोलीस आयुक्त पदासाठी नेमणूक केली जायची.
  • महाविकास आघाडी सरकार जाताच नव्या सरकारने या पदाची निर्मिती केली आहे.
  • आता सरकारने या नव्या पदाची निर्मिती केली असून त्याजागी देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
  • दिल्ली पोलिसांच्या धर्तीवर मुंबईतही अशा प्रकारचा प्रयोग करण्यात आला आहे.
  • पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या अंतर्गतच देवेन भारती काम पाहणार आहेत.
  • देवेन भारती यांच्याकडे गुन्हे आणि आर्थिक गुन्हे शाखा यांची जबाबदारी असणार आहे.
  • भारती यांना पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनाच अहवाल द्यावा लागणार आहे.

Latest News