कवाडे यांना घेतांना एकनाथ शिंदे यांनी माझ्याशी चर्चा करायला हवी होती- RPI रामदास आठवले


ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-
रामदास आठवले आज दिल्लीमध्ये माध्यमांशी बोलत होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीत युतीची चर्चा सुरू असताना, पीपल्स रिपब्लिकन पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षात युती झाली. राज्यातील राजकारणाला नवीन वळण देणारी घटना घडली आहे . यावर बोलतांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले ( Ramdas Athavale) यांनी घणाघाती टिका केली आहे.
, मुंबईत मुख्यमंत्री आणि प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी पत्रकार परिषद घेत युती याबाबतची घोषणा केली. “जोगेंद्र कवाडे यांना घेतांना एकनाथ शिंदे यांनी माझ्याशी चर्चा करायला हवी होती. त्यांना घेण्याची गरज नव्हती” .
केंद्र व राज्य सरकारने देशातील भूमीहीन कुटुंबांना प्रत्येकी पाच एकर जमीन द्यावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. अशी योजना अमलात आणण्याबाबत ठराव करण्यात आला आहे, अशी माहितीही आठवलेंनी दिली.
त्यामुळे आगामी काळात देशातील भूमीहीन कुटुंबाना पाच एकर जमीन मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुंबई प्रमाणे एसआरए ची योजना राज्यातील इतर प्रमुख शहरातही ही योजना राबवावी, अशी मागणी आठवलेंनी केली आहेजैन धार्मियांचे आस्थास्थान असलेल्या सम्मेद शिखरजी तीर्थ स्थळाला केंद्र आणि झारखंड सरकारने पर्यटनस्थळ घोषित केल्याचा निर्णय मागे घेवून तीर्थस्थळ घोषीत करण्यात यावे, या मागणीसाठी सकल जैन समाजाच्या वतीने आंदोलन करण्यातआले होते.
सम्मेद शिखरच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सम्मेद शिखरला पर्यटन स्थळ बनवण्याच्या निर्णयाला केंद्राने तत्काळ स्थगिती दिली आहे. जैन समाजाच्या मागणीनंतर केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचं स्वागत आहे. जैन समाजाच्या पाठीशी नेहमी उभं राहणार असेही आठवले यावेळी म्हणाले. यादरम्यान, येत्या केही दिवसात राज्यमंत्रीमंडळाचा विस्तार होणार आहे. विस्तार करताना आमच्या पक्षाला एक मंत्री पद मिळणार आहे. माध्यमांशी बोलतांना आठवले यांनी सांगितले.