विकासाच्या कामाला कशाला परवानगी?निधी काय पालकमंत्र्याच्या घरातला आहे का?- अजित पवार


पुणे (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना-) विकासाच्या कामाला कशाला परवानगी हवी. निधी काय पालकमंत्र्याच्या घरातला आहे का? यांना कोणी बोलवतच नाही म्हणून हे आदेश ऑर्डर काढले असावेत. अरे पालकमंत्र्यात पण धमक पाहिजे, असं अजित पवारांनी म्हटलं आहे
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर त्यांनी काढलेल्या एका आदेशावरुन टीकास्त्र सोडलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी काढले आहे की माझ्याशिवाय कार्यक्रम करू नका, पण कोणी बोलावत नसेल म्हणून हे आदेश काढले असले पाहिजेत,पुण्यात अजित पवार यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यलयाचे उद्घाटन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
पर्वती विधानसभामध्ये माजी नगरसेवक सुभाष जगताप यांच्या कार्यलयाचे उद्घाटन अजित पवारांनी केले तोडतोडीचं राजकारण करून स्थिरता राहत नाही. आता सरकार कसं आलं तुम्हला माहिती आहे. स्थिरता असेल तर अधिकारी काम करतात पण आता बघा काय चालले आहे.
आता उद्योग गेले,नोकऱ्या गेल्या,उद्योग गेल्याच दुःख लोकांना आहे पण राजकारण्यांना नाही, असंही अजित पवारांनी म्हटलं योगी महाराज आले आहेत. ते तिकडून येऊन आपल्या उद्योगवर डल्ला मारत आहेत आणि आपले मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री काय करत आहेत.
सगळ्यात जास्त बेरोजगारी आपल्या महाराष्ट्रात आहे. मंत्रिमंडळ विस्तार अजून नाही. आधी दोनच टीकोजीराव सरकार चालवत होते. परत मंत्रिमंडळ विस्तार केला तर एका एकाला सहा-सहा मंत्रालय दिले. सावित्रीबाई फुले जिजाऊच्या महाराष्ट्रात एकही महिला मंत्री मंत्रिमंडळात नाही. अशी टीकाही अजित पवारांनी केली.