लग्न सभारंभात चोरी केलेले २६ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे जप्त



लग्न सभारंभात चोरी केलेले २६ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे जप्त हिंजवडी पोलीस तपास पथकाची कामगीरी
.पिंपरी:: पुण्यातील हिंजवडीत वऱ्हाडी बनून लग्न समारंभात आलेल्या चोरट्यांनी ६५ तोळे सोन्याचे दागिने, ९ लाख रुपये रोख रक्कम घेऊन पोबारा केला होता. ही घटना एका ऑर्चिड हॉटेलमध्ये घडली होती. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी मोठ्या शिताफीने मध्यप्रदेशमधील कडीयासांसी या गावात जाऊन ६५ पैकी ५३ तोळे सोन्याचे दागिने परत आणले आहेत
ऑर्चिड हॉटेलमध्ये लग्न सभारंभातुन कोणीतरी अज्ञात चोरटयाने लग्नातील लोकांची नजर चुकवुन लग्नातील मुलीकडील ६५ तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे व ९,००,०००/- रोख रक्कम चोरी केल्याची तक्रार हिंजवडी पोलिसात केली होती
६ डिसेंबर २०२२ रोजी पुण्याच्या हिंजवडी हद्दीत एका नामांकित हॉटेल मध्ये लग्न समारंभ सुरू होता. त्या लग्नात वऱ्हाडी बनून दोन चोरट्यांनी प्रवेश केला. अगदी ड्रेस कोड आणि भाषा त्याच समाजाची बोलल्याने ते चोर आहेत की वऱ्हाडी हे कोणालाच समजलं नाही. चोरट्यांनी वधू मुलीच्या आईच्या हालचालीवर बारीक नजर ठेवली आणि काही सेकंदात ६५ तोळे सोन्याचे दागिने आणि ९ लाख रुपये रोख रक्कम असलेली पर्स घेऊन चोरटे पसार झाले. सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम जास्त असल्याने काही मिनिटात त्या समारंभात गोंधळ उडाला. हिंजवडी पोलीस तात्काळ घटनस्थळी पोहचले. सीसीटीव्हीद्वारे तपास केल्यानंतर ते चोरटे मध्यप्रदेश येथील असल्याचं गुप्त माहिती पोलिसांना मिळाली..
चोरटे निष्पन्न झाले होते. मात्र, कडीयासांसी या गावात जायचं धाडस कोणी करत नव्हतं. कारण, त्या गावात चोरी करणाऱ्यांची संख्य जास्त आहे. त्या गावात पोलिस किंवा अनोळखी व्यक्तीने प्रवेश केल्यास त्या व्यक्तीला बेदम मारहाण केली जाते. वेळ पडल्यास गोळीबार ही केला जातो. त्यामुळ राम गोमारे यांच्या टीमने अवधी घेतला १७ दिवसांचा मुक्काम त्या परिसरात केला
. स्थानिक बोडा पोलिसांची मदत घेऊन हिंजवडी पोलीस त्या गावात पोहचले काही मिनिटात च मोठा जमाव तिथं जमला पोलिसांना घेरण्यात आलं. पोलीस आणि नागरिक आमनेसामने आले होते. स्थानिक पोलिसांनी त्या जमावाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते
. अखेर त्यांना हवेत गोळीबार करावा लागला. जमाव पांगल्यानंतर पोलिसांनी त्या चोरट्याच्या घरातून ५३ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. चोरटे मात्र पसार झाले असून ५३ तोळे सोन्याचे दागिने परत आणण्यात पोलिसांना यश आले आहे. चोरट्यांना पकडण्याच मोठा आव्हान पोलिसांसमोर आहे. पोलिस कर्मचारी कैलास केंगले, विक्रम कुदळे, अरुण नरळे, सागर पंडित यांचा सहभाग देखील या कामगिरीत होता.
ऑर्चिड हॉटेलमधील लावण्यात आलेल्या सी.सी.टि.व्हि. फुटेजची बारकाईने पाहणी करीत असताना दोन अनोळखी इसम हे लग्न सभारंभात येवुन लोकांची नजर चुकवून फिर्यादी यांचे आईने सोन्याचे दागिणे व रोख रक्कम ठेवलेली पर्स घेवुन जात असताना दिसले.
तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक राम गोमारे यांना बातमीदारमार्फत माहिती मिळाली की, अशाप्रकारे लग्न सभारंभात मध्यप्रदेश राजगढ़ जिल्हातील असु शकतात. ठिकाणी जावुन खात्री करुन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यास सांगितली होती
१) रितीक महेश सिसोदिया वय २० वर्षे व २) वरुण राजकुमार सिसोदिया वय २३ वर्षे हे असल्याचे समजले. तेथील विशेष गोपनीय बातमीदाराकडुन बातमी मिळाली की सदरची चोरी ही आरोपी नामे १) रितीक महेश सिसोदिया वय २० वर्षे २) वरुण राजकुमार सिसोदिया वय २३ वर्षे व शालु रगडो धपानी वय २८ वर्षे व ४) शाम लक्ष्मीनारायण सिसोदिया वय ३८ वर्षे सर्व रा. ग्राम कडीयासांसी ता. पचोर ठाना बोडा जि. राजगढ राज्य मध्यप्रदेश यांनी मिळुन केली आहे.
स्थानिक पोलीसांचे मदतीने वरील चारही आरोपींचा शोध घेतला. परंतु ते राहते घरी मिळुन आले नाहीत, त्यामुळे स्थानिक पोलीसांचे मदतीने नातेवाईकांकडे कौशल्याने तपास करून गुन्हयातील चोरी गेलेल्या सोन्याचे दागिन्यांपैकी २६ लाख रुपये किंमतीचे ५२ तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे जप्त केले आहेत. दाखल गुन्हयातील आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन त्यांचेवर विविध राज्यात चोरीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपींचा व उर्वरीत दागिन्यांचा शोध चालु आहे.